हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाचा संशोधक विद्यार्थी रोहित विमुला याच्या आत्महत्त्या प्रकरणात राजीनामा द्यावा, या मागणीसाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात गुरुवारी व्हीएनआयटी परिसरत युवक काँग्रेस, एनएसयुआय आणि काही इतर संघटनांनी जोरदार निदर्शने केली. पोलिसांनी या प्रकरणी युवक काँग्रेस नेते कुणाल राऊत यांच्यासह काही युवकांना ताब्यात घेण्यात आले. प्रचंड पोलीस बंदोबस्त असतानाही झालेल्या या निदर्शनामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
व्हीएनआयटीमध्ये गुरुवारी दुपारी एका कार्यक्रमासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम होता. युवक काँग्रेस व एनएसयुआयने आधीच रोहित वेमुलाच्या मुद्यावर निदर्शने करण्याची तयारी केली होती. मात्र, पोलिसांना सूचना मिळाल्यावर बंदोबस्त लावला होता. दुपारी स्मृती इराणी येण्याच्या वेळी कार्यकर्त्यांचा २० ते ३० युवकांचा एक समूह गनिमीकावा पद्धतीने व्हीएनआयटीमधील कार्यक्रमस्थळी आला. सुरुवातीला कृणाल राऊत यांच्या नेतृत्त्वाखाली अभिषेक सिंह, आशीष मंडपे, माधुरी सोनटक्के, रितेश पाटील, अमीर नुरी, अजिज सिंग, धिरज पांडे यांनी निदर्शनाला सुरुवात केली.
इराणींच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. स्मृती इराणी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. पोलिसांनी तत्काळ निदर्शकांना ताब्यात घेतले. दरम्यान, बजाजनगर चौकातही एका संघटनेतर्फे स्मृती इराणी यांना काळे झेडे दाखविण्यात आले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना लगेचच बाजूला सारले.
स्मृती इराणींविरोधात काँग्रेसची निदर्शने
हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाचा संशोधक विद्यार्थी रोहित विमुला याच्या आत्महत्त्या प्रकरणात राजीनामा द्यावा
Written by लोकसत्ता टीम
First published on: 12-02-2016 at 02:07 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress protests against smriti irani