भाजपचे वरिष्ठ नेते व जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्य सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर पुलवामा घटनेबाबत व संघाचे राम माधव यांच्यावर ३०० कोटींच्या प्रस्तावाबाबत केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतचे सत्य लोकांना सांगावे, अशी मागणी करीत शहर काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात पक्षाचे झेंडे घेऊन केंद्र सरकारचा निषेध केला.पुलवामामध्ये २०१९ मध्ये ४० जवानांचे प्राण गेले. त्यात सरकारची चूक होती हे सत्यपाल मलिक यांनी निदर्शनास आणून दिले असता केंद्रातील मोदी सरकारने त्यांना गप्प राहण्यास सांगितले. जवानांना दुसरीकडे पाठवण्यासाठी विमानाची मागणी केली असता ती का नाकारण्यात आली ? सर्वात महत्त्वाचे या घटनेत वापरले गेलेले ३०० किलो आर.डी.एक्स. कुठून आले? असे अनेक प्रश्न सत्यपाल मलिक यांच्या खुलाशानंतर निर्माण झाले आहेत.

Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
cbi anil Deshmukh marathi news
सीबीआयकडून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलीस उपायुक्त, निवृत्त सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा
Amit Shah on article 370
जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करताना अमित शाह यांचं कलम ३७० बाबत मोठं विधान; म्हणाले…
Eknath Shinde announcement in the meeting of government officers employees organizations regarding pension
निवृत्तिवेतनासाठी सर्व पर्याय खुले; शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा
Mamata Banerjee is aggressive in the Assembly on the safety of women
विधेयकाच्या आडून भाजप लक्ष्य, विधानसभेत ममता बॅनर्जी आक्रमक; प. बंगालमध्ये ‘अपराजिता’ कायदा
Himanta Biswa Sarma
CM Himanta Sarma : “आसामला धमकवण्याची तुमची हिंमत कशी झाली?” ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ विधानवरून मुख्यमंत्री सरमा यांचा हल्लाबोल!

हेही वाचा >>>नागपूर: धवनकरांनी प्राध्यापकांना पैसे मागितल्याची ध्वनिफीत ‘लोकसत्ता’च्या हाती

पुलवामा घटना व ४० जवानांचे बलिदान भाजप व नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी केले का, या सर्व प्रश्नांचे उत्तर जनतेला मिळायला हवेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटन सरचिटणीस राम माधव यांनी ३०० कोटी रुपयांच्या लाचेचा प्रस्ताव दिला होता, हा आरोपही गंभीर आहे. या प्रश्नाचे उत्तर मोदी सरकारने जनतेला द्यावे, असेही आमदार विकास ठाकरे म्हणाले.या आंदोलनात प्रामुख्याने प्रदेश काँग्रेसचे समाज माध्यम शाखेचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, प्रदेश उद्योग व वाणिज्य सेलचे अध्यक्ष अतुल कोटेचा, सरचिटणीस उमाकांत अग्निहोत्री, प्रदेश सचिव प्रशांत धवड, माजी नगरसेवक रमन पैगवार, शहर महिला अध्यक्षा नॅश अली, प्रा. दिनेश बानाबाकोडे यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.