नागपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव संदेश सिंगलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. राज्य घटना बदलण्यासाठी ४०० जागांवर विजय मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे एवढ्या जागा भाजपला द्या, असे आवाहन भाजप खासदारांनी लोकसभा निवडणुकीत केले होते. त्याविरोधात ही तक्रार आहे. संविधान “संपण्याच्या” प्रयत्नांना भाजप पक्षश्रेष्टी स्पष्टपणे पाठिंबा देत असल्याचा आरोप करण्यात आला असून बभाजप नेत्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

सिंगलकर म्हणाले की, या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचे काही खासदार, उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी संविधान बदलण्यासाठी पक्षाला लोकसभेच्या ४०० जागा जिंकायच्या आहेत, असे जाहीर वक्तव्य केले होते. “भारताच्या राज्यघटनेच्या अस्तित्वाला हा थेट धोका आहे. पण भाजपच्या सर्वोच्च नेतृत्व , पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्याच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही आणि विधाने परत घेतली नाहीत. मोदी, शहा आणि नड्डा हे असंविधानिक विचारांचे समर्थक असल्याचे यावरून दिसून येते,” असे सिंगलकर यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
constitution of india credit loksatta
चतु:सूत्र : संविधाननिर्मितीचे श्रेय कोणाला?
News About Loksabha
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण

हेही वाचा…रवी राणांच्‍या विरोधात बच्‍चू कडूंची पत्‍नीही मैदानात

संविधानात दुरुस्ती करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला दोन तृतियांश बहुमत द्या, असे आवाहन भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांनी लोकसभा निवडणुकीत केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन विविध चर्चांना सुरुवात झाली होती. आता विरुद्ध आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी अबकी बार ४०० पार घोषणा दिली होती. तो धागा पकडून हेगडे यांनी हे वक्तव्य केले होते. मोदी यांची ४०० पारची घोषणा का? कारण लोकसभेत आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. परंतु राज्यसभेत आमच्याकडे बहुमत नाही. राज्य सरकारमध्येही आमच्याकडे आवश्यक बहुमत नाही. जर आगामी लोकसभा निवडणुकीत ४०० जागाहून अधिक जागा मिळाल्या तर राज्यसभेतही बहुमत मिळवण्यासाठी मदत होईल असे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी म्हटले होते.

Story img Loader