भारत जोडो यात्रा दरम्यान  अटकली ( जिल्हा नांदेड) येथे नागपूरचे काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्ण कुमार पांडे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. पांडे यांनी आज भारत जोडो यात्रेच्या झेंडा तुकडीचे संचालन केले. त्या दरम्यान त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता, त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले. तेथे त्यांचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… भारत जोडो यात्रेतील ऊर्जेमुळे महाराष्ट्रातील मरगळलेल्या काँग्रेसमध्ये चैतन्य

हेही वाचा… ‘भारत जोडो’ यात्रेत ३० हजारांहून अधिक वैदर्भीय सहभागी होणार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, दिग्विजय सिंह, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई, एच के पाटील, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, संदेश सिंगलकर, महेंद्र सिंह वोहरा यांनी श्रद्धांजली वाहली.