नागपूर : देवेंद्र फडणवीसांचे प्रवक्ते नितेश राणे यांनी राहुल गांधी यांनी मनोज जरांगे पाटलांना फोन केला का? हे विचारण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जरांगे पाटलांना फोन का केला नाही हे सांगावे, असा प्रतिप्रश्न काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. त्यांनी याबाबत चित्रफीत प्रसिद्ध केली आहे.
अतुल लोंढे म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या सरकारने नितेश राणेंचे वडील नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून मराठा समाजाला आरक्षण दिले होते, त्यामुळे नितेश राणेंनी त्यांच्याकडून थोडी माहिती घ्यावी आणि मगच बोलावे.
हेही वाचा – नागपूर : “कुणबी समाजाने मोठं मन करून काय होणार”, तायवाडेंचा मिटकरींना सवाल
काँग्रेस वर्किंग कमिटीने आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा केंद्र सरकारने काढावी असा ठराव केलेला आहे. ती मर्यादा का हटवत नाही हे नितेश राणेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारावे, असे लोंढे यांनी म्हटले आहे.