नागपूर : २००४ साली काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अजित पवार होते. त्यांचा नाइलाज होता तर त्यांनी मंत्रीपदाची शपथ कशासाठी घेतली? मंत्रीपदाची शपथच घ्यायला नको होती. पृथ्वीराज चव्हाण आमचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल अजित पवारांनी असे बोलावे ही अपेक्षा नाही. खदखद वाटत होती तर त्यावेळीच सोडून जायला हवे होते, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. राजकारणातील कोणीही मुख्यमंत्री व्हायची इच्छा बाळगली तर त्यात वावगे काहीच नाही, अजित पवार यांच्याकडे १४५ चा बहुमताचा आकडा असेल तर त्यांनी जरूर मुख्यमंत्री व्हावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मलिकांनी पुलवामाचे सत्य उघड केले म्हणून चौकशी

पुलवामा घटना झाली त्यावेळी सत्यपाल मलिक हे जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते. त्यावेळच्या घटनेचे सत्य त्यांनी जनतेसमोर उघड केले. आपल्या जवानांवर केलेला तो भ्याड हल्ला आहे. त्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिले पाहिजे. पण उत्तर न देता केंद्र सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणला म्हणून सत्यपाल मलिकांनाच ‘सीबीआय’कडून नोटीस पाठवण्यात आली आहे, असे पटोले म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress state president nana patole criticism of ajit pawar amy
First published on: 23-04-2023 at 02:05 IST