लोकसत्ता टीम
नागपूर : नरेंद्र मोदी यांचा करिश्मा उतरला आहे, राहुल गांधी यांनी जी भूमिका जनतेसमोर मांडली, पदयात्रा केली त्यामुळे जनतेचा आवाज काँग्रेस सोबत होता. मोठया प्रमाणात इंडिया आघाडीला देशात समर्थन मिळाले आहे ते निकालातून दिसेल. महाराष्ट्रातही ४ जूननंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट राहील की नाही हा प्रश्न आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते नागपुरात बोलत होते.
महाराष्ट्रात महाविकास अघडी ४० पुढे तर इंडिया आघाडीत ३०० च्या पुढे जाणार आहे. आज महाराष्ट्रात दुष्काळ आहे, पिण्याचे पाणी नाही, शेती पीक नष्ट झाले. आज शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू सत्तेतील लोकांना का दिसत नाही. जनावरांना चारा नाही. दुधाचा भाव घसरला आहे, दुधातून व्हिटॅमिन मिळत नाही. शेतकऱ्याची काळजी का नाही, त्याला फार महत्व देण्यासारखे सत्ताधाऱ्यांना काही वाटत नाही का असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा-दुर्दैवी… तीन रोहींचा विहिरीत पडून मृत्यू; पाण्याच्या शोधात भटकंती, वनविभागाची उदासीनता
अजित पवार भांबावले आहे .त्याच्यावर काय बोलणार आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याने सत्ताधारी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पटोले यांनी केली. पुण्याप्रमाणे नागपुरात सुद्धा घटना घडली, जळगाव मध्ये त्यापेक्षा मोठी घटना झाली. राज्यात गर्भश्रीमंत साठी वेगळा न्याय आणि गरिबांना वेगळा न्याय आहे. मुख्यमंत्री सुट्टीवर गेले आहे. जनतेचा जीव सुरक्षित नाही. या सरकारमधील लोकांवर सोशल मिडियातून टीका केली जात असताना त्यांना काळं नाही का. या गर्भश्रीमंत लोकांकडून अपघातानंतर निबंध लिहून घेतला जातो. लोक भयभीत आहे, प्रशासन कोणाचे ऐकत नाही. मुख्यमंत्री यांनी खुलासा करावा मात्र ते सुट्टीवर गेले आहे
अग्रवाल बिल्डर असून त्याचे पुरावे असू योग्य वेळी खुलासे करू, कोणाचा सहभाग आहे हे योग्य वेळी मांडू, सरकारने लपावा छपवी करू नये. ४ जून नतंर आम्ही सर्व समोर आणू असेही पटोले म्हणाले. महायुतीत महाभारत सुरू आहे. त्यावर मला चर्चा करावी वाटत नाही. निवडणूक आयोगाला मताची टक्केवारी वाढली याबाबत निवेदन दिले होते. लोकशाही व्यवस्थेत मत गायब होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न आहे. राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजे अशी इच्छा आहे, पण आज यावर चर्चा होणार की नाही हे मला माहित नाही. इंडिया आघाडीची आज निकालावर बैठक होईल, लोकांचा आशीर्वादाने बहुमत होईल, तातडीने सरकार स्थापन होणे गरजेचे आहे.
पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण होईल, यावर बैठकीत चर्चा होणार नाही असेही पटोले म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान कोणीही सहन करु शकत नाही. पण मनुस्मृती अभ्यासक्रमात आणण्याचा प्रयत्न होत आहे तर भाजपचा आम्ही विरोध करणार आहे. आंबेडकरांचा फोटो फाडण्याचे समर्थन कोणीही करणार नाही मात्र भाजप त्यावर राजकारण करत असेल तर त्याला आम्ही विरोध करू असेही पटोले म्हणाले.
उद्धव ठाकरे हे सरकार नाही. त्यामुळे त्यांनी येतथे राहावे की नाही हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. पण मुख्यमंत्री यांनी जनतेसाठी उभे राहावे ही भूमिका आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे ही गंभीर बाब आहे. बियाण्यांचा काळ बाजार होता आहे, त्याला सरकार मधील काही मंत्र्यांचा सहभाग असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आहे. उन्हात उभे राहून बियाणेसाठी रांगा लावत आहे धानाची वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे वेळ पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असेही पटोले म्हणाले.