नागपूर:  देशात विरोधी पक्षच नको अशी भाजपची भूमिका आहे. त्यामुळे ईव्हीएमच्या माध्यमातून महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ झाले व आता लोकसभेतही असाच प्रकार सुरु आहे. भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ‘ऑपेरेशन लोटस’, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे काही खासदार आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर पटोले यांनी ही टीका केली. पटोले यांनी बुधवारी नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Maharashtra Assembly Elections 2024 Narendra Modi BJP MVA
‘गुजरात मॉडेल’चा महाराष्ट्रात पायरव…
Purwa Walse Patil emotional post for father dilip walse patil
Purva Walse Patil: “आजारी व्यक्तीच्या मरणाची कामना…”, वडिलांच्या आरोग्यावर विरोधकांकडून विधान, पूर्वा वळसे पाटील संतापल्या
Readers reaction on Girish kuber article lilliputikaran in loksatta lokrang
पडसाद : असाही इतिहास
Congress on EVM Tampering
विधानसभेत मविआची दाणादाण उडाल्यानंतर ‘ईव्हीएम’वर शंका; काँग्रेस-राष्ट्रवादीकडून पुन्हा मतपत्रिकेची मागणी
Will Shaktipeeth Bhakti Peeth and industrial highways be built after the victory of the Mahayuti
महाविजयानंतर शक्तिपीठ, भक्तिपीठ, औद्योगिक महामार्ग मार्गी लागणार का?
Mallikarjun Kharge against voting machines demanded a protest print politics news
Mallikarjun Kharge: खरेग यांच्याकडून मतपत्रिकेचा आग्रह; देशव्यापी मोहीम राबविण्याचे पक्षाकडून संकेत

हेही वाचा >>>बंगला सज्ज,विरोधी पक्ष नेत्याबाबत अनिश्चितता

जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असा लौकिक असलेल्या भारतातील लोकशाहीला संपुष्टात आणण्याचे पाप केले जात आहे. भाजपा सरकार सर्व यंत्रणांच्या माध्यमातून लोकशाही पायदळी तुडवत असून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतांवर दरोडा टाकला जात आहे.

 विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आलेले सरकार आपल्या मताचे नाही ही जनभावना आहे. जनतेच्या मनात शंका आहे. मारकडवाडीनंतर अशी भावना देशपातळीवर वाढीस लागली  आहे. ग्रामसभा ठराव करून मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली जात आहे. रात्रीत  ७६ लाख मते कशी वाढली ते निवडणूक आयोगाने अद्याप सांगितले नाही. असे नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा >>>यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

अधिवेशन एक महिन्याचे असावे

भाजपा युती सरकारचे पहिले अधिवेशन नागपुरात होत आहे. राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत आहे. महागाई, बेरोजगारी, नोकरभरती, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला हमीभाव देणे अशा मुद्यांवर अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे. शेतकऱ्यांना सरसकट तीन लाख रुपयांची कर्जमाफी दिली पाहिजे, नोकरभरती कशी करणार अशा विविध मुद्द्यांवर साधकबाधक चर्चा नागपूरच्या अधिवेशनात होणे अपेक्षित आहे, यासाठी नागपूर अधिवेशन कमीत कमी एक महिन्याचे असावे, अशी मागणी केली होती, पण भाजपा युती सरकारने केवळ पाच दिवसांचे अधिवेशन सरकार चर्चेपासून पळ काढत आहे. 

एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत वाद नाही. तीनही पक्ष एकत्र बसून विरोधी पक्षनेत्याचे नाव निश्चित करतील व नागपूर अधिवेशनात सरकार यावर निर्णय घेईल. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेता व गटनेता ठरवण्याचे सर्व अधिकार पक्षश्रेष्ठींना दिले आहेत, त्यावरही लवकरच निर्णय होईल असे पटोले म्हणाले.

Story img Loader