बुलढाणा: काँगेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी गुरुवारी अंतरवाली सराटी येथे भेट देऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश देऊन शासनाने स्वतःचा नाकर्तेपणा सिद्ध केल्याची घणाघाती टीका त्यांनी यावेळी बोलताना दिली. त्या म्हणाल्या की, आंदोलकांवर लाठीचार्ज करून भ्याड हल्ला करण्यात आला.
हेही वाचा… सख्ख्या भावंडांची पोलीस दलात निवड; प्रतिकूल परिस्थितीवर मात
शासनाच्या या दडपशाहीला न जुमानता मराठा समाजबांधवांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अतिशय धाडसी आहे. सर्व समाजबांधवांना आपला अभिमान आहे. या लढ्यामध्ये माझ्यासह महाराष्ट्रातील सर्व जनता आपल्या सोबत आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी जरांगे यांना दिला.