काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर तिवसा येथे धरणे आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलीस यंत्रणेची काहीवेळ तारांबळ उडाली होती. पेट्रोल पंप चौक ते तहसील कार्यालय असे २ किमी अंतर पायी चालत शेतकरी व पदाधिकारी यांनी तहसील कार्यालय गाठले आणि मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले.

हेही वाचा >>>पूर्व विदर्भातील ९४ टक्के हिवतापग्रस्त गडचिरोलीत

Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
Efforts underway to reduce human-wildlife conflict says Vivek Khandekar
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू – खांडेकर
Chief Minister Devendra Fadnavis launches drug-free Navi Mumbai campaign
नवी मुंबई पोलिसांचा नशामुक्तीचा नारा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ
mumbai municipalitys bridge connecting Marve and Manori beaches has received approval
मार्वे मनोरी जोडणाऱ्या पुलाला पर्यावरणाची मंजुरी
kalyan MNS citizens road agaitationTruck crushes mother, child
कल्याणमध्ये ट्रकने आई, मुलाला चिरडले; मनसेसह नागरिकांचे रस्ता रोको
Elgar Sanghatanas march in Trimbak for houses
नाशिक : घरांसाठी त्र्यंबकमध्ये एल्गार संघटनेचा मोर्चा

तिवसा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन, तूर, कापूस, संत्री या पिकांचे अतोनात नुकसान झाले. आधीच हवालदिल शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. जिल्ह्यातील पीक पैसेवारी सुद्धा जाहीर झाली असून तिवसा तालुक्याची पैसेवारी ४७ पैसे आली म्हणजेच दुष्काळी उपाययोजना शासन व प्रशासनाने कराव्या यासाठी तालुका पात्र आहे, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. तिवसा तालुक्यातील वरखेड मंडळातील २५ गावांतील हजारो शेतकरी शासनाच्या बेजबाबदारपणामुळे ऐन दिवाळीत मदतीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे वरखेड महसूल मंडळातील २५ गावांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी. विमा कंपनीकडून सुद्धा सर्वेक्षण सुरू आहे, पण पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना मदत देण्यास तयार नाही. महसूल व कृषी विभागाचे नुकसान सर्वेक्षण त्यांना मान्य नाही अशी माहिती उपलब्ध होत आहे याबाबत निराकारण करावे, पीकविमा नुकसानभरपाई लवकर देण्यात यावी यासाठी उदासीन असलेल्या कृषी खात्यामार्फत व पिकविमा मिळावा, अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली.

हेही वाचा >>>ओबीसींसाठी निर्वाह भत्ता योजनाच नाही ; उच्च शिक्षण मंत्र्यांकडून दिशाभूल

यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली. आंदोलनात तालुका अध्यक्ष मुकुंदराव देशमुख, माजी जिल्हा परिषद सभापती दिलीप काळबांडे, कार्याध्यक्ष सतीश पारधी, माजी सभापती चंद्रशेखर ठाकूर, नगरसेवक वैभव वानखडे, नगराध्यक्ष योगेश वानखडे, पंचायत समिती पदाधिकारी रोशनी पुनसे, कल्पना दिवे, अब्दुल सत्तार, अतुल गवड, अतुल खुळे, धीरज ठाकरे, सौ रुपाली काळे, किशोर दिवे, शरद वानखडे, नीलेश खुळे, रवी हांडे, रितेश पांडव, अतुल कळंबे आदी सहभागी झाले होते.

Story img Loader