बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार महाविकास आघाडीच्या जागावाटपात नागपूर शिक्षक मतदारसंघ काँग्रेसच्या वाटय़ाला आला आहे. येथे काँग्रेसतर्फे कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे कोणत्यातरी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्याशिवाय काँग्रेसकडे पर्याय नव्हता. अखेर अडबाले यांना काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. माजी मंत्री सुनील केदार यांनी आज मंगळवारी याबाबतची घोषणा केली.सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार यांनी मात्र बंडखोरी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Maharashtra MLC Election Results Live: “..म्हणून मी जिंकणार”,शुभांगी पाटील यांनी सांगितलं मतांचं गणित; सत्यजीत तांबेंच्या पराभवाचा दावा!

आता प्रमुख दावेदार म्हणून भाजप समर्थित नागोराव गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले रिंगणात आहेत. अशा स्थितीत काँग्रेस झाडे की अडबाले यापैकी कुणाला समर्थन देते याकडे लक्ष लागले होते.मंगळवारी, माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नागपूर निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजीत वंजारी, बबनराव तायवाडे, रवींद्र दरेकर उपस्थित होते. या बैठकीनंतर केदार यांनी सुधाकर अडबाले यांना काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress supports adbale in nagpur for teachers constituency election amy