नागपूर : प्रत्येक निवडणुकीच्या पूर्वी ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर विरोधीपक्षाकडून शंका घेतली जाते. मतपत्रिकेवरच मतदान घ्यावे, अशी मागणी केली जाते. सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेले. त्यांनीही ईव्हीएमवरील सर्व शंका फेटाळून लावल्या. त्यानंतर काँग्रेसने ईव्हीएमवर नुसतीच टीका करण्यापेक्षा नेमके हे यंत्र काम कसे करते, त्याला कसे हाताळावे लागते, त्याबाबतची तांत्रिक माहिती कार्यकर्त्यांना देण्यावर भर दिला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने हा प्रयोग यशस्वीरित्या केला. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आल्यावर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय पक्षातर्फे घेण्यात आला. नागपूर शहर काँग्रेस समितीतर्फे रविवारी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ईव्हीएमबाबतची माहिती देण्यात आली. ईव्हीएम नेमके काम कसे करते, त्याकडे कसे लक्ष द्यावे याबाबतची माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञ ॲड. पवन डहाट यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा