अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे वर्चस्‍व असल्‍याने या मतदारसंघातून कॉंग्रेसला निवडणूक लढवू द्यावी, अशी आग्रही मागणी कॉंग्रेसच्‍या आमदार यशोमती ठाकूर, माजी राज्‍यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्‍यासह अनेक‍ स्‍थानिक नेत्‍यांनी माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍याकडे केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यशोमती ठाकूर यांच्‍यासह कॉंग्रेसच्‍या अनेक स्‍थानिक नेत्‍यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांची विश्रामगृहावर भेट घेतली. अमरावती लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे प्रभुत्व अधिक असल्‍याने आमचा अमरावती लोकसभा लढविण्‍याचा आग्रह असल्‍याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले. यावेळी कॉंग्रेसचे आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, कॉंग्रेसचे जिल्‍हाध्‍यक्ष बबलू देशमुख, शहराध्‍यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर मिलिंद चिमोटे यांच्‍यासह अनेक नेते उपस्थित होते.

हेही वाचा – वाशीम : उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य ; खासदार गवळी विरोधात कोण ?

पाहुण्‍यांचे स्‍वागत करण्‍याची अमरावतीची परंपरा आहे. त्‍यामुळे आम्‍ही उद्धव ठाकरे यांच्‍या स्‍वागतासाठी आलो आहोत, असे यशोमती ठाकूर यांनी सांगितले. स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुका सत्ताधाऱ्यांनी तात्‍काळ घ्‍याव्‍यात, कोणाची किती ताकद आहे, हे दाखवून देऊ, असे यशोमती ठाकूर म्‍हणाल्या.