राजेश्वर ठाकरे

केंद्रात सत्तेत आल्यानंतर भाजपा केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास देत आहे. काँग्रेस पक्ष तसा वागला असता तर भाजपा दोन खासदारांच्यावर जाऊ शकला नसता. परंतु काँग्रेसमध्ये दरबारी नेत्यांची संख्या अधिक झाली. काँग्रेसमधील या ‘गोडबोले’ नेत्यांमुळे काँग्रेसचे नुकसान झाले व भाजपा दिल्ली काबिज करू शकला, अशा शब्दांत बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पक्षाला घरचा आहेर दिला.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावल्याच्या विरोधात नागपुरातील ईडी कार्यालयासमोर काँग्रेसने सोमवारी आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांसमोर बोलताना वडेट्टीवार यांनी काँग्रेसमध्ये संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा गोड-गोड बोलून पद मिळवणाऱ्यांची चलती असल्याकडे लक्ष वेधले.

National Herald Case: राहुल गांधी पुन्हा ईडी कार्यालयात हजर; पहिल्या टप्प्यात तीन तासांच्या प्रश्नोत्तरानंतर पुन्हा एकदा चौकशी सुरु

वडेट्टीवार यांनी भाजपाकडून ईडीचा वापर विरोधी पक्षातील नेत्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी होत असल्याची टीका केली. “भाजपाची मुळात ताकदच नव्हती. पण, भाजपा वाढण्यास काँग्रेस नेतेच कारणीभूत आहेत. पक्षाने संघर्ष करणारा, पक्षाचे काम करणाऱ्याला ताकद द्यायला हवी. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे. परंतु दुर्देवाने काही गोष्टी पक्षात अशा घडल्या ज्यामुळे नुकसान झाले,” असेही वडेट्टीवार म्हणाले.

Story img Loader