लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : राज्य सरकार प्रशासकाच्या माध्यमातून नागपूर महापालिकेचा कारभार चालवत असून त्यांचे महापालिका प्रशासकाला अभय आहे. त्याचा परिणाम प्रशासन सुस्त झाले असून जनता त्रस्त आहे. सर्वत्र अस्वच्छता आणि पाणी साचले असून डासांचा त्रास आणि चिकन गुणिया तसेच डेंग्यूची लागण मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे, असा आरोप शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी आज पत्रकार परषदेत केला आणि या विषयाला वाचा फोडण्यासाठी शहर काँग्रेस स्वाक्षरी मोहीम राबवण्याचे जाहीर केले. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे महासचिव विशाल मुत्तेमवार उपस्थित होते.

नागपूर महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या भोंगळ कारभारामुळे दरवर्षी नागपुरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचते. पावसाळी नाल्या नाहीत. ज्या भागात आहेत तेथे कचरा घट्ट बसल्यामुळे ते निरुपयोगी आहे. नेत्यांना खूश करण्यासाठी प्रशासनाकडून अनियोजित पद्धतीने सुरु असलेले मार्गांचे सिमेंटी काँक्रीट रस्ते बांधणे सुरु आहेत. शहरातील अनेक भागांत तर सिमेंट रस्त्यांची उंची ही नागरिकांच्या घरांपेक्षा अधिक असल्याने पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसते.

आणखी वाचा-गिधाडांचा प्रवास : हरियाणा ते महाराष्ट्र

महापालिका प्रशासक डांसाचा उत्पत्ती होणार नाही. यासाठी आवश्यक उपाययोजना करीत नाहीत. शहरात मोठ्या अस्वच्छता असून रोगराई परसली आहे. प्रशासक केवळ राज्यकर्त्यांची मर्जी राखण्यासाठी काम करीत आहेत. त्यांनी जनतेशी काही देणेघेणे नाही. त्याचा परिणाम आज शहरात चिकनगुणीया आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

फक्त मिसकॉल द्या

भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांच्या मनमानीमुळे दरवर्षी शहरात कुत्रिम जलप्रलय निर्माण होते. त्याविरोधात सुरु असलेल्या आमच्या अभियानात सहभागी होण्यासाठी ०७१२-७१२७१९१२३२ या नंबरवर मिसकॉल द्या अथवा https://chng.it/LNvWH25gnb लिंकवर क्लिक करुन ऑनलाईन पिटीशन साईन करता येईल.

आणखी वाचा-“नवनीत राणांचा नंबर लागला, आता माझा….…”, आमदार रवी राणा असे का म्‍हणाले?

सहाही मतदारसंघात काँग्रेस जिंकणार

सहा विधानसभा मतदारसंघासाठी ७३ जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. यावरून महाराष्ट्रातील राजकारणाची हवा कोणत्या दिशेने वाहत आहे हे समजले. शहरातील सहा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार राहतील आणि सर्व विजयी होतील, असा दावाही विकास ठाकरे यांनी केला. काँग्रेसने विधानसभेसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले होते. १० ऑगस्ट २०२४ या शेवटच्या दिवसापर्यंत ७३ जणांचे अर्ज आले.

आंबेडकर भवन पाडणाऱ्यांकडून १० कोटी वसूल करा

अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह पाडणाऱ्यांकडून १० कोटी वसूल करण्यात यावे. तसेच शासकीय इमारत विनापरवानगी ध्वस्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही विकास ठाकरे यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress will organize public awakening against the municipal corporation in nagpur rbt 74 mrj