वर्धा : आष्टी बाजार समितीत काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात काँग्रेसने दणदणीत विजय प्राप्त केला आहे. भाजपाचे आमदार दादाराव केचे यांना पराभव बघावा लागला.
हेही वाचा – वाशीम, मानोऱ्यात महाविकास आघाडीची सरशी; मतमोजणीला सुरुवात, लवकरच चित्र स्पष्ट होणार
आष्टी बाजार समितीत भाजपाचीच सत्ता होती. मात्र केचे यांना ती कायम राखता आली नाही. अठरापैकी पंधरा जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले असून तीनच जागा भाजपाला मिळाल्या. या ठिकाणी अमर काळे विरुद्ध आमदार केचे व संत्रा उत्पादकांचे नेते श्रीधर ठाकरे, अशी लढाई रंगली होती. भाजपाने सत्ता कायम राखण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले. सत्ताधारी पक्षाचा आमदार स्वतः सूत्र हलवित असल्याने सर्वांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. पण अमर काळे यांना लोकांनी पसंती दिली. वर्धा, सेलू, देवळी पाठोपाठ आष्टीत महाविकास आघाडीने सत्ता खेचल्याने भाजपा वर्तुळात शांतता पसरली आहे.