नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर लोकसभा सचिवालयाने काँग्रेसनेते राहुल गांधी यांची खासदारकी बहाल केली. त्यासंदर्भातील अधिसूचना निघताच नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मानेवाडा मार्गावर फटाके फोडून,लाडू वाटून आनंद व फुगडी खेळूनआनंदोत्सव साजरा केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा आणि लोकशाहीचा हा विजय जनतेचा भविष्यकाळ उज्ज्वल करेल, राहुल गांधी यांनी दिलेला प्रेमाचा संदेश देशात परिवर्तन घडवून आणेल, अशी प्रतिक्रिया यावेळी काँग्रेस नेते गिरीश पांडव यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ब्लॉक काँग्रेसचे पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय, सेवादलचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.