नागपूर: अखिल भारतीय काँग्रेस कार्यसमितीची बैठक गुरुवारी नागपुरातील हाॅटेल रेडिसन ब्लू येथे झाली. यात आगामी लोकसभेसह काही राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या नियोजन व राहूल गांधी यांच्या भारत न्याय यात्रा आदी मुद्यांवर चर्चा झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य उपस्थित होते. नागपुरात रात्री उशिरा बैठक संपल्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते जयराम रमेश माध्यमांशी बोलताना म्हणाले, आज नागपुरात ‘है तयार हम’ ही महारॅली विशाल होती. लवकरच लोकसभा निवडणुका येत आहे. सोबत काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही आहे. त्याच्या तयारीबाबत बैठकीत दोन तास चर्चा झाली. येत्या निवडणुकीसाठी आम्हाला काय करायचे आहे. याबाबत येथे मंथन झाले. दरम्यान ४ जानेवारीला दिल्लीत काँग्रेस पक्षाची उच्चस्तरीय बैठक आहे. त्यातही यावर मंथन होईल. भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा भारत न्याय यात्रेच्या नावाने १४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. ही यात्रा ६ हजार २०० किलोमीटरची आहे. त्या संदर्भातही नागपुरात चर्चा झाली. ही यात्रा जाणार असलेल्या सर्वच राज्यांतील प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारींना यात्रेबाबत माहितीही दिली गेल्याचेही जयराम रमेश म्हणाले.

हेही वाचा – नागपूर : ‘एम्स’मध्ये पेटस्कॅनसाठी रुग्णांची फरफट ! औषध नसल्याचे सांगत परत पाठवणी

हेही वाचा – मंदिराच्या आमिषाला बळी पडू नका! काँग्रेसच्या स्थापनादिनी मल्लिकार्जुन खरगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

भाजपाकडून राजकीय फायद्यासाठी देवाचा वापर- अजय कुमार

आजच्या बैठकीत विषयपत्रिकेत येत्या निवडणुकीचा विषय होता. त्याच्या तयारीवर बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक राज्यासमोर वेगळे आवाहन आणि संधीही आहे. त्यावर सविस्तरपणे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि इतरही पदाधिकाऱ्यांनी प्रकाश टाकला. सकारात्मक पद्धतीने संघटन सशक्त करण्यावरही चर्चा झाली. मी नेहमी सांगत असतो देव सगळ्यांचे असतात. भाजपाने प्रभू रामाच्या नावावर घोटाळे केले. राजकीय फायद्यासाठी देवाचाही वापर करत आहे. आमची सर्वच धर्मावर आस्था आहे. देवाच्या नावावर राजकारण करणे योग्य नाही, असे अखिल भारतीय काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अजय कुमार म्हणाले.