बदलता पाऊस पाणी, बाजारभाव, सरकारी धोरण याबरोबरच अनेक कारणांमुळे ज्वारीचे पीक घटले. दिवसेंदिवस गव्हाचे उत्पादन वाढत चालले असून ज्वारीचे पीक घेण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. मात्र, कृषी संशोधन केंद्र वाशीम येथे दुर्मिळ आणि अतिप्राचीन ज्वारीच्या २५ हजार जनुके लागवड करून त्याचे उत्तम संगोपन केले आहे. लवकरच देश, विदेशातील कृषी अभ्यासक भेट देऊन या वाणाची पाहणी करणार आहेत.

हेही वाचा >>>नागपूर: अल्पवयीन मुलीची पोटदुखीची तक्रार अन् गर्भवती असल्याचे झाले निदान; प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

nashik jaljeevan mission aims to provide 55 liters of clean water daily
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातच ‘जलजीवन मिशन’ संकटात, चार वर्षात केवळ २९४ योजना पूर्ण
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
maize ethanol loksatta news
राज्यात मक्याचे क्षेत्र दुप्पटीने वाढले; जाणून घ्या, क्षेत्र वाढ का आणि किती झाली
592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
nashik water news marathi
नाशिक जिल्ह्यात ३५७ गावांत वैयक्तिक विहिरी, विंधनविहिरींवर बंदी; १५ पाणलोट क्षेत्रात भूजलाचा बेसुमार उपसा
pune sahakar nagar water supply cut
पुणे : शहरातील ‘ या ‘ भागात गुरुवारी पाणी नाही !
Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
pune water bill marathi news
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?

मागील एक दोन दशकांचा विचार करता ज्वारी पीक कमी झाल्याने ज्वारीचे भाव तेजीत आले असले तरी उत्पादन मात्र घटले आहे. परंतु, देशातील ‘नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसर्च’ने पुढाकार घेतला असून ज्वारीच्या अतिप्राचीन आणि दुर्मिळ जातीवर संशोधन केले जात आहे. त्यानुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी संशोधन केंद्र वाशीम येथे वेगवेगळ्या आणि दुर्मिळ होत चाललेल्या अती प्राचीन ज्वारीच्या २५ हजार जनुकांची लागवड नोव्हेंबरमध्ये करण्यात आली होती. हा अवघड प्रयोग देशातील पहिलाच प्रयत्न असून वाणाची वाढ उत्तम झाली असून पीक देखील बहरले आहे. लवकरच या वाणाची तज्ञ अभ्यासक, शास्त्रज्ञ पडताळणी करणार असून, आगामी काळात हे वाण शेती आणि शेतकऱ्यांना फायद्याचे ठरेल, अशी माहिती कृषी शास्त्रज्ञ गीते यांनी दिली.

हेही वाचा >>>“उद्धव ठाकरेंना बंडाची कल्पना होती, त्यांनी महिनाभरापूर्वीच शिंदेंना बोलावून घेतले आणि…”, चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट

केंद्रीय कृषी मंत्री घेणार आढावा
वाशीम येथे १३ मार्च रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय कृषीमंत्री, राज्याचे कृषीमंत्री, कृषी सचिव तसेच विविध अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहणार असून ज्वारीच्या वाणांचा आढावा घेतला जाणार आहे.

Story img Loader