* केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
* २२ नोव्हेंबरपासून इंडियन रोड काँग्रेस</strong>
इंडियन रोड काँग्रेसचे ७९ वे चार दिवसीय अधिवेशनला २२ नोव्हेंबरपासून नागपुरात सुरू होत असून त्यासाठी देशातील सर्व राज्यातील बांधकाम मंत्री आणि रस्ता विकासाशी संबंधित तज्ज्ञ शहरात येत आहे. यात जगभरात रस्ते बांधकामासाठी विकसित तंत्रज्ञानावर चर्चा होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
इंडियन रोड काँग्रेस ही रस्ते विकास आणि संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठित अशी राष्ट्रीय संघटना आहे. या संघटनेचे दरवर्षी राष्ट्रीय अधिवेशन होत असते. सार्वजनिक बांधकाम विभाग या परिषदेचे आयोजन करीत असते. यावर्षी राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग यजमान आहे. यात रस्ते आणि त्यासंबंधातील वैज्ञानिक अभ्यास व संशोधन सादर केले जाणार आहे.
या सर्व अभ्यासावरून आरआरसी-कोड म्हणजे भारताच्या रस्ते निर्मिती संबंधातील मापदंड ठरवण्यात येतात. गुरुवारी २२ नोव्हेंबरला अधिवेशनाच्या तांत्रिक सत्रांचे उद्घाटन होईल. पहिल्या दिवशी विविध सत्रांमध्ये आयआयटी सारख्या संस्थांमधील विद्यार्थी आपली शोधपत्रे सादर करतील. त्याचप्रमाणे रस्ते विकास क्षेत्रातील वैज्ञानिकही यावेळी मार्गदर्शन करतील.
शुक्रवारी, २३ नोव्हेंबरला अधिवेशनाचे औपचारिक उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात येईल. या परिषदेला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरीही मार्गदर्शन करतील. शनिवारी, २४ नोव्हेंबरला विविध तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले असून रविवारी २५ नोव्हेंबरला अधिवेशनाचा समारोप होईल.
लोकसहभागाला विशेष महत्त्व
अधिवेशनात लोकसहभागाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने रस्ते सुरक्षा जागृती क्षेत्रात कार्यरत संस्थांना केवळ १०० रुपये शुल्कात स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना देखील या परिषदेत आपले संशोधन सादर करावयाचे असल्यास केवळ ११० रुपये शुल्कात स्टॉल उपलब्ध होणार आहे.
रेडिमेड सिमेंट रस्ता
रस्त्याचे खोदकाम आणि त्यानंतर अनेक दिवस चालणारे सिमेंट काँक्रिटचे काम यातून येत्या काही वर्षांत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्याचा पथदर्शी प्रकल्प म्हणून नागपूर रिंग रोडवर बाहेरून तयार केलेल्या सिमेंट काँक्रिटचे पॅनल टाकण्यात येत आहेत. येत्या आठ दिवसात ३०० मीटर परिसरात या पॅनल बसवण्यात येतील. त्यामुळे काही मिनिटात सिमेंट रस्ता तयार झालेला असेल. व्हीएनआयटीमध्ये या संदर्भातील प्रयोग झाला आहे. पुढे चालून कारखान्यात मोठय़ा प्रमाणात अशा पॅनल तयार केल्या जातील आणि वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते तयार होतील, अशी माहिती गडकरी यांनी दिली.