एकीकडे नागपूर आंतरराष्ट्रीय शहराच्या दिशेने वाटचाल करीत असताना मुलांच्या करमणुकीसाठी येथे विशेष उद्यान किंवा तत्सम अशी सोय नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी महामेट्रोने अंबाझरी तलावाजवळ ‘क्रेझी केसल’च्या जागेवर आगळावेगळा अशा मनोरंजन पार्कची उभारणी केली असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या काही महिन्यात त्याचे उद्घाटन होण्याची शक्यता महामेट्रोने वर्तवली आहे.

हेही वाचा- “सरकार तुमचेच, जुनी पेन्शन तत्काळ लागू करा”; आमदार अडबाले यांचे राज्य सरकारला आवाहन

adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
traffic congestion, Parking problem APMC navi mumbai double parking, trucks
एपीएमसीतील पार्किंग समस्या जटिल, ट्रकच्या दुहेरी पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
fire toy shop Amravati, Amravati, fire toy shop,
अमरावतीत खेळणी दुकानाला भीषण आग
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई

महामेट्रोने नागपुरात जागतिक दर्जाच्या मेट्रो प्रकल्पाची उभारणी करून या क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. या प्रकल्पाच्या नावे अनेक विक्रम नोंदवले गेले असून त्यापैकी काहींची गिनीज बुकातही नोंद झाली आहे. महामेट्रो फक्त मेट्रो प्रकल्प उभारणीपर्यंत मर्यादित न राहता रस्ते व इमारत बांधकाम प्रकल्प उभारणीतही प्रवेश केला आहे. अंबाझरी तलावाजवळीत ‘क्रेझी केसल’ची जागा महामेट्रोला मिळाल्यावर तेथील पूर्वीच्या मनोरंजन प्रकल्पाला आधुनिक व आगळा-वेगळा प्रकल्प उभारण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला होता. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. नागपूरमध्ये मुलांसाठी विशेष असे उद्यान किंवा तत्सम प्रकल्प नाहीत. ही या शहराची गरज असल्याने त्यांच्यासाठी वेगळे काही तरी करण्याचा प्रयत्न म्हणून हा मनोरंजन प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच तो लोकांसाठी खुला केला जाईल, असे महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी अखिलेश हळवे यांनी सांगितले.

हेही वाचा- वाशीम: दुर्मिळ आणि अतिप्राचीन ज्वारीच्या २५ हजार दुर्मिळ वाणांचे जतन, वाचा सविस्तर…

पूर्वीच्या ‘क्रेझी केसल’मध्ये मनोरंजन पार्कसह वॉटर पार्कचीही सोय होती. पण, महामेट्रो पहिल्या टप्प्यात फक्त मनोरंजन पार्कच सुरू करणार आहे. दुसऱ्या टप्प्यात वॉटर पार्कचे नियोजन आहे. मनोरंजन पार्कमध्ये जुन्या पूर्वीच्या खेळण्यांसह काही आधुनिक खेळणीही ठेवण्यात येणार आहे. मुलांच्या विविध वयोगटाचा अभ्यास करून या पार्कची रचना करण्यात आली आहे. अंबाझरी तलावाजवळ मेट्रोचे स्थानकही असून तेथे प्रवाशांसाठी गॅलरीचेही नियोजन आहे. मेट्रो प्रवासासोबत पर्यटनही हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. सध्या अंबाझरी तलाव, स्वामी विवेकानंद स्मारक पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते. मेट्रो सुरू झाल्यापासून पर्यटकांची संख्या वाढती आहे. मनोरंजन पार्कमुळे त्यात अधिक भर पडण्याची शक्यता आहे.