केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मंत्री होण्यापूर्वी पासूनच वर्धा जिल्ह्यावर लोभ. अडगळीत पडलेला महात्मा साखर कारखाना त्यांच्या समूहाने विकत घेवून मार्गी लावला. बेरोजगारांसाठी भव्य मार्गदर्शन शिबिर त्यांनी प्रथम वर्धेतच घेतले होते. आता तर ते वर्धा लोकसभा क्षेत्राचे पक्ष प्रभारीच झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पिकांवर जाळी पसरून ते जपण्याचा ‘शेड नेट ‘ प्रकल्प त्यांच्या मदतीने सुरू झाला आहे. भिडी व परिसरातील शिरपूर, अकोली, हुरदानपुर या तीन गावातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. गडकरी यांचे विश्वासू सहकारी सुधीर दिवे म्हणाले, की गडकरी या प्रकल्पास मदत व मार्गदर्शन करीत आहे. हे हरितगृह परिसरास वरदान ठरणार. शेतकऱ्यांनी उभारणी करतांना स्वतःचे काम समजून लक्ष दिले पाहिजे.भाजीपाला व अन्य स्वरूपातील शाश्वत उत्पन्न मिळू शकेल, असे ते म्हणाले.

हेही वाचा >>>“कुशल मनुष्‍यबळ निर्मिती ही शिक्षण क्षेत्राची जबाबदारी”, उपमुख्‍यमंत्री फडणवीस म्हणतात..

अशा प्रकल्पांचे तज्ज्ञ म्हणून ओळख असणारे रियाज अली सय्यद यांच्या देखरेखखाली हे काम मार्गी लागत आहे. लाभधारक शेतकऱ्यांनी या मदतीबद्दल गडकरी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. बँकेचे कर्जही मिळणार असल्याचे सांगण्यात आले.