गोंदिया : देवरी ग्रामीण रुग्णालयाच्या नवनिर्मित इमारतीच्या लोकार्पणाला घेवून देवरीतील विद्यमान आमदार सहेसराम कोरेटी आणि माजी आमदार संजय पुराम यांच्यात श्रेयवाद चांगलाच चव्हाट्यावर आला होता. दरम्यान, प्रशासनाने क्षुल्लक, किरकोळ कामे पूर्ण केल्यानंतर इमारतीचे लोकार्पण करण्यात येईल. त्यानुरूप सुरक्षा भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र, अभियंताच्या अजब तंत्रज्ञानातून कॉलम व पाया शिवाय भिंतीचे बांधकाम केले जात आहे. त्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत.
तर दुसरीकडे हे दर्जेदार काम उघडपणे होत असले तर श्रेयवादासाठी समोर येणारे जनप्रतिनिधी (आजी व माजी आमदार) दिसून येत नाही, त्यामुळे निकृष्ठ बांधकामातून होणाऱ्या भ्रष्टाचाराला श्रेय लाटण्यासाठी पुढे येणाऱ्यांची मुकसम्मती तर नाही, अशी प्रतिक्रियाही सर्वसामान्यां कडून उमटू लागली आहे. शासकीय काम म्हटले की,त्यात भ्रष्टाचार ही बाब अग्रस्थानी असते. याची प्रचीती ही देवरी येथील नवनिर्मित ग्रामीण रुग्णालय इमारतीचे बांधकाम देत आहे.ग्रामीण रुग्णालयासाठी इमारतीचे बांधकाम करण्यात आले.
हेही वाचा >>> “काँग्रेसच्या काळात तयार झालेले शासकीय रुग्णालय आता भाजपकडून खराब केले जात आहे”, नाना पटोलेंची टीका
मात्र ते बांधकाम गेल्या तीन वर्षापासून अद्यापपर्यंत पुर्णत्वास आले नाही. तर दुसरीकडे जिर्ण इमारतीतच ग्रामीण रुग्णालयाची सेवा दिली जात आहे. यामुळे जनप्रतिनिधींमध्ये इमारत लोकार्पणाला घेवून श्रेयवाद सुरू झाला. विद्यमान आमदारांनी इमारतीचे लोकार्पण केले. तर माजी आमदार संजय पुराम ने विद्यमान आमदाराच्या या लोकार्पणाला श्रेय लाटण्याचा प्रकार म्हणून समोर केला. दरम्यान चांगलाच श्रेयवाद चव्हाट्यावर आला होता. जनप्रतिनिधीच्या या श्रेयवादात प्रशासनाने उडी घेतली. इमारतीचे किरकोळ कामे त्वरित पुर्ण करून लोकार्पण करण्याचे आश्वासन दिले. त्यानुरूप इमारत परिसरातील किरकोळ कामे शुरू करण्यात आली.
हेही वाचा >>> इथे घरकूलकरिता मोजावे लागतात सहा हजार रुपये, नेमका काय आहे प्रकार? वाचा…
मात्र शासकीय कामे कसे दर्जाहीन केले जातात, याचे परिचय उघडपणे यंत्रणेकडून सुरक्षा भिंतीच्या बांधकामावरून दिले जात आहे. सुरक्षा भिंत विना कॉलम व बिना पाया ने उभी केली जात आहे. त्यामुळे अभियंताचा अजब तंत्रज्ञान देवरी तालुक्यात चांगलाच चर्चेत आला आहे. दर्जाहीन सुरू असलेल्या सुरक्षा भिंतीच्या बांधकामकडे श्रेयवादात उडी घेणार, ते आजी व माजी कुठे गेले ? असा प्रश्नही आता जनतेकडून उपस्थित केला जात आहे.