नासुप्रला केवळ नोटीस बजावण्यातच रस
मंगेश राऊत
नागपूर : उपराजधानीतील अनेक वस्त्या गुन्हेगारीसाठी ओळखल्या जातात. पण, आता काही व्यावसायिक प्रतिष्ठानेही गुन्हेगारीचे अड्डे बनले असून यात पहिल्या क्रमांकावर ‘झिरो डिग्री’ बार आहे. या बारचे बांधकाम अवैध असून नागपूर सुधार प्रन्यासकडून बारला केवळ अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी नोटीस बजावून पुढे काहीच केले जात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत झिरो डिग्री बार आहे. या बारचे मालक अवैध सावकारीसाठी ओळखला जाणारा कुख्यात गुंड तपन जयस्वाल व त्याची पत्नी आहे. तपन जयस्वाल व त्याचा गुंड साथीदार गोलू मलीये याच्यासह इतरांविरुद्ध काही महिन्यांपूर्वी अवैध सावकारी व खंडणी वसुलीचे ३ गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांनी त्याची आर्थिक रसद तोडण्यासाठी झिरो डिग्री बारची माहिती काढली असता बारची जमीन दुसऱ्याच्या मालकीची तसेच इमारत बांधकाम बायकोच्या नावाने असून सर्व बांधकाम अनधिकृत असल्याचे समोर आले. त्यानंतरही अनेक वर्षांपासून हा बार सुरू आहे. पोलिसांनी पाच महिन्यांपूर्वी नासुप्रला बारचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची विनंती केली. नासुप्रने बार व इमारत बांधकाम मालकाला नोटीस बजावून बांधकाम का पाडण्यात येऊ नये, अशी विचारणा केली. २०१८ मध्येही नासुप्रने बांधकाम पाडण्यासाठी नोटीस बजावली होती. पण, पुढे कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. याचा अर्थ नासुप्रची भूमिका केवळ नोटीस बजावण्यापूर्ती दिसत आहे. गोरगरिबांच्या बांधकामांवर तत्काळ हातोडा चालवणारी नासुप्र श्रीमंत व गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या बांधकामांची पाठराखण तर करीत नाही ना, असा सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.
बांधकाम नियमित करण्याचा प्रयत्न
नासुप्रने इमारत बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगून कारवाई करण्यासाठी नोटीस बजावली आहे. या नोटीसला नगर विकास राज्यमंत्र्यांकडे आव्हान देण्यात आले असून राज्यमंत्र्यांनी नोटीसवर पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. दुसरीकडे हे बांधकाम नियमित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
– तपन जयस्वाल, बार मालक.
बारविरुद्ध आतापर्यंत ८ गुन्हे
झिरो डिग्री बार गुन्हेगारीचा अड्डा बनलेला आहे. बारमध्ये शहरातील अनेक गुंड दिवसरात्र बसून असतात. शिवाय बार मालकाविरुद्धही अनेक गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत पोलिसांनी बारवर अनेकदा कारवाई करून नियमांचे उल्लंघन करणे व इतर कृत्यांसाठी ८ गुन्हे दाखल केले आहेत. या बारमध्ये काही वर्षांपूर्वी गोळीबारही झाला होता, हे विशेष. या प्रकरणातही गुन्हा दाखल आहे.