वर्धा : दूषित पाणीपुरवठा आर्वी तालुक्यातील नांदपूरकरांसाठी कमालीचा मनस्ताप देणारा ठरत आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्यात कमालीचा हलगर्जीपणा दिसत असल्याचा आरोप गावकरी संजय चाफले करतात. त्यांच्या घरी येणाऱ्या नळाच्या पाण्यातून एकदा चक्क पक्ष्याचे मृत पिल्लू आले. त्यांनी ग्रामपंचायतकडे तक्रार करीत दोन दिवस लोटत नाही तोच पक्ष्याचे पंख आलेत. परत तक्रार झाली. मात्र सुधारणा नाहीच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – नागपूर : ‘एम्स’चे शवविच्छेदनगृह प्रलंबितच! २० किलोमीटर लांब न्यावे लागतात मृतदेह

हेही वाचा – नागपूर : आरोग्य विभागातील कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आजपासून असहकार आंदोलन

गावातल्या पाण्याच्या टाकीची नियमित सफाई होत नसल्याचा ते आरोप करतात. टाकीला झाकण नाही. म्हणून पक्षी, त्यांची विष्ठा, कचरा येवून पडतो. असा दूषित पुरवठा बंद न झाल्यास सर्व गावकऱ्यांसह उपोषणास बसणार असल्याचा इशारा चाफले यांनी दिला आहे. गत पंधरा दिवसांपासून दूषित पाणी येत असल्याची तक्रार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contaminated water supply is causing great anguish for the people of nandpur in arvi taluka pmd 64 ssb
Show comments