धूलिवंदनापासून सलग चार दिवस सुटय़ा लागून आल्याने रंगोत्सवाच्या जल्लोषात अधिक रंग भरला जाणार आहे. होळीच्या रंगोत्सवाची वर्षभरापासून प्रतीक्षा असते, यासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजनही केले जाते. साधारणपणे धूलिवंदनाची एकाच दिवसाची सुट्टी असल्याने उत्सव साजरा करण्याला तशी मर्यादा येते. कारण दुसऱ्याच दिवसापासून कामावर रुजू होण्याचे दडपण विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विशेषत: सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना आणि शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांवर असते. मात्र, यंदाची होळी खऱ्या अर्थाने वेगळी ठरणार आहे. होळीला लागूनच सलग चार दिवसांच्या सुटय़ा आल्या आहेत. २४ ला धूलिवंदनाची, २५ ला गुडफ्रायडे, २६ला चौथा शनिवार आणि २७ ला रविवार अशा चार सुट्टय़ांमुळे होळीचा रंग अधिकच चढणार आहे.
अनेकांनी बाहेरगावी जाऊन रंगोत्सव साजरा करण्याचा बेत आखला आहे तर दरवर्षी नागपुरातच होळी साजरी करणाऱ्यांनी यंदा या सुट्टय़ांमुळे आपल्या मूळगावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. काहींनी होळी पर्यटनस्थळावर जाऊन साजरी करण्याचा कार्यक्रम आखला आहे. एक आठवडय़ाआधीपासूनच याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सोसायटीतील समूह, विद्यार्थ्यांच्या गटांनी तसे नियोजन केले आहे. सलग सुट्टय़ांमुळे ईव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनी शहराबाहेरील रिसोर्टमध्ये काही कार्यक्रमही आयोजित केले आहे. नागपूरहून पुणे, जबलपूर, हैदराबाद, रायपूर या शहरासाठी सुटणाऱ्या खासगी बसेसचे आरक्षण चार दिवसांआधीच फुल्ल झाले आहेत. टॅक्सीचे दरही वाढलेले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा