गडचिरोली : उपचारात हलगर्जीपणा केल्याने आणि वेळेत रुग्णवाहीका उपलब्ध न झाल्याने चार वर्षीय आर्यन तलांडी या चिमुकल्याचा २४ जून रोजी मृत्यू झाला होता. याप्रकरणी ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित करताच खळबळून जागे झालेल्या प्रशासनाने पेरमिली आरोग्य केंद्रातील कंत्राटी डॉक्टरला तडकाफडकी बडतर्फ केले आहे. सोबतच वैद्यकीय अधिकारी व वाहनचालक यांना नोटीस बजावली असून चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती गठीत केली आहे.

आर्यन अंकित तलांडी (४, रा. कोरेली ता. अहेरी) यास २३ जूनच्या रात्री पोटदुखीचा त्रास सुरु झाला. कुटुंबाने पेरमिली आरोग्य केंद्रात त्याला उपचारासाठी नेले. उपचारानंतर आर्यनला पालकांनी घरी कोरेलीला परत नेले. २४ जूनला पहाटे अधिक त्रास होऊ लागल्याने त्याला पुन्हा पेरमिली आरोग्य केंद्रात नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यास अहेरी येथे नेण्यास सांगितले. परंतु, वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने पालक आर्यनला घेऊन बसने अहेरीसाठी निघाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contract doctor dismissed in case of child death in gadchiroli ssp 89 amy
First published on: 28-06-2024 at 18:52 IST