लोकसत्ता टीम
गडचिरोली : सरकारी नोकरभरती बंद करून १३७ संवर्गातील शासकीय नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने बाह्य स्त्रोतांच्या कंपन्यांमार्फत भरल्या जाणार आहेत. या कंपन्या भाजप नेत्यांच्या आहेत, असा आरोप माजी गृहमंत्री तथा आमदार अनिल देशमुख यांनी केला.
आणखी वाचा-Monsoon Update: मान्सूनच्या परतीचा प्रवास १० ऑक्टोबरपासून
गडचिरोली येथे गुरुवारी कुणबी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात सहभाग दर्शविण्यासाठी ते गडचिरोली येथे आले असता पत्रकारांशी संवाद साधला. बिहार राज्याने जातनिहाय सर्वेक्षण केले आहे, असे सर्वेक्षण महाराष्ट्राने करावे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, अन्यथा समाजात तेढ निर्माण होऊ शकते, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (पवार गट) जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, संजय ठाकरे, विजय गोरडवार, रमन ठवकर, राजेंद्र वैद्य आदी उपस्थित होते.
धर्मरावबाबांना मंत्री बनायचेच होते
ईडीचा धाक दाखवत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडले. मात्र अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार यांना ईडीचा धाक दिला नव्हता. त्यांना मंत्री बनायचे होते. त्यामुळे ते भाजप सरकारमध्ये सहभागी झाले.