लोकसत्ता टीम

नागपूर : स्थायी करण्याच्या मागणीसाठी कंत्राटी आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप शनिवारी कायम राहिल्याने रुग्णांचा मन:स्ताप कायम होता. शनिवारी नागपूर जिल्ह्यातील सुमारे अडिचशे आंदोलक मुंबईच्या आझाद मैदानासाठी निघाले. तर रविवारीही पाचशेच्या जवळपास आंदोलक निघणार असल्याचा संपकर्त्यांचा दावा आहे.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
shinde shiv sena got responsibility in Maharashtra state assembly elections 2024 for pune
‘धोका’ टाळण्यासाठी ‘मित्रा’ला साकडे; महायुतीकडून शहरात एकही जागा न लढविणाऱ्या शिवसेनेची (शिंदे) यंत्रणा सक्रिय
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Action against rebels, rebels Akola Rural,
बंडखोरांवर कारवाईचा बडगा, अकोला ग्रामीण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निलंबित

आणखी वाचा-बुलढाणा : ट्रकची चोरी केली, पोलिसांच्या जाळ्यात टोळी अडकली!

मुंबईतील आझाद मैदानावर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ३० आणि ३१ ऑक्टोबरला आंदोलनाची हाक दिली आहे. नागपुरात संपकर्त्यांनी शनिवारी संविधान चौकात निदर्शने न करता आता मुंबईला निघण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार सुमारे २५० आंदोलक शनिवारीच विविध रेल्वेने मुंबईसाठी रवाना झाले. तर रविवारी सुमारे ५०० आंदोलक मुंबईला जाण्याच्या तयारीत असल्याचे संपकर्त्यांकडून सांगण्यात आले. मात्र, संप लांबत असल्याने ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांच्या आरोग्य सेवेवरही आता परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे संपावर तोडगा कधी निघणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या विषयावर नागपुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून मात्र प्रशासनाने सर्व आवश्यक कारवाई केल्याने रुग्णसेवा सुरळीत असल्याचा दावा केला आहे.