राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात होऊ घातलेल्या प्राधिकरणांच्या निवडणुकांमधील अनेक दोष समोर येत आहेत. त्यातच आता विद्यापीठ कायद्याने नवीन पेच निर्माण केल्याने कंत्राटी प्राध्यापकांना विधिसभेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा दोन्ही गटातून उमेदवारी घेता येणार नाही. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या कंत्राटी प्राध्यापकांच्या पदरी विधिसभा निवडणुकीतही उपेक्षा आली आहे.

हेही वाचा >>> गडचिरोली : नक्षल्यांनी केली सहकाऱ्याचीच हत्या; पोलीस खबरी असल्याचा पत्रात आरोप

special quota in hostel admission has finally been cancelled
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी… वसतिगृह प्रवेशातील ‘विशेष कोटा’ अखेर रद्द…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
loksatta analysis pune witnesses alarming rise In crime rate
पुणे गुन्हेगारीत नाही उणे! राज्याची सांस्कृतिक राजधानी असंस्कृत, असुरक्षित का बनतेय?
MPSC has made an important change in Maharashtra Non-Gazetted Group B and Group C Services Examination
‘एमपीएससी’ गट- ‘क’ सेवा परीक्षा, निकालाबाबत मोठी बातमी, नवीन अर्जदारांसाठीही महत्त्वाचे
pune 11th admission
पुण्यात अकरावीच्या हजारो जागा रिक्त…विद्यार्थ्यांची प्रवेशाकडे पाठ का?
MPSC Mantra  Administrative System State Services Main Examination career news
MPSC मंत्र : प्रशासकीय व्यवस्था; राज्यसेवा मुख्य परीक्षा – सामान्य अध्ययन पेपर दोन
Mumbai University lacks faculty and courses delaying BBA and BCA for 2024 25 mumbai
मुंबई विद्यापीठात ‘बीबीए’ आणि ‘बीसीए’ अभ्यासक्रम रखडले, संबंधित अभ्यासमंडळ व अभ्यासक्रम तयार नसल्याने अभ्यासक्रम रखडले
Who is Navya Haridas
Navya Haridas: प्रियांका गांधींना वायनाडमध्ये तगडं आव्हान; RSS ची पार्श्वभूमी असलेली नव्या हरिदास केरळमध्ये कमळ फुलविणार?

नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांच्या निवडणुकांच्या हालचाली सुरू आहेत. यामध्ये विधिसभेच्या पदवीधर गटासाठी उमेदवारी अर्ज भरणे सुरू झाले आहे. त्यामुळे विद्यापीठामध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये कंत्राटी तत्त्वावर काम करत असलेल्या प्राध्यापकांना पदवीधर निवडणुकीमध्ये अर्ज करता येणार नाही अशी माहिती समोर आली आहे. विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये अनेक वर्षांपासून प्राध्यापक भरती न झाल्याने कंत्राटी प्राध्यापकांच्या भरवशावर अध्यापन सुरू आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये मोठ्या संख्येने कंत्राटी प्राध्यापक सेवेत आहेत. मात्र, या कंत्राटी प्राध्यापकांना विधिसभेच्या शिक्षक आणि पदवीधर दोन्ही गटामध्ये उमेदवारी घेता येणार नाही, असा पेच कायद्याने घातला आहे. कायद्यानुसार विधिसभेवर शिक्षक गटातून उमेदवारी अर्ज करायचा अधिकार हा नियमित प्राध्यापकांना आहे. कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती ही एका वर्षासाठी असल्याने ते या गटात अर्ज करू शकत नाही. त्यामुळे कंत्राटी प्राध्यापकांना पदवीधर गटातून अर्ज करता येणे अपेक्षित आहे. मात्र, पदवीधरच्या दहा जागांवर नियमित व कंत्राटी तत्त्वावरील प्राध्यापकांना उमेदवारी अर्ज करता येणार नाही, असा नियम आहे. दोन्ही गटात कंत्राटी प्राध्यापकांना उमेदवारी देण्यासाठी कायद्याने पेच घातल्याने अनेक इच्छुकांची संधी हुकली आहे.

हेही वाचा >>> नागपूर : नोटबंदीमुळे देशातील अर्थगती थांबली, काँग्रेसने पाळला काळा दिवस

असा आहे कायदा

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८(२)(न) नुसार नामनिर्देशनाचे दिनांकाच्या किमान पाच वर्षे आधी पदवी प्राप्त केलेले दहा नोंदणीकृत पदवीधर विधिसभेवर निवडून देण्याकरिता पात्र आहेत. मात्र, यामध्ये नियमित किंवा कंत्राटी तत्वावरील अध्यापकांचा, मग त्यांच्या अध्यापकीय अनुभव काहीही असो यांचा या प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या पदवीधरांमध्ये समावेश होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.

विधिसभा मतदार यादीत घोळ

माजी विधिसभा सदस्य डॉ. केशव मेंढे यांचा मतदार यादी क्रमांक ५८१ आहे. हे मतदान केंद्र देवरी, जिल्हा गोंदिया येथील आहे. डॉ. केशव मेंढे यांनी नागपूरमध्ये नोंदणी केली. असे असतानाही त्यांचे नाव गोंदियाच्या केंद्रावर गेले कसे? हेतूपुरस्सर अनेक नावाची दलबदली दूरवर केल्याचे निदर्शनास आले. विद्यापीठाशी सौख्य साधणारी संघटना व विद्यापीठातील अधिकारी यांच्या संगनमताचा हा कुटील डाव असल्याचा आरोप डॉ. मेंढे यांनी केला. अनेकांना मतदान करण्यापासून रोखण्याचे कटकारस्थान विद्यापीठाने आखल्याचे स्पष्ट दिसून येते असाही त्यांनी आरोप आहे.