नागपूर : भीमा कोरेगाव दंगलीत सहभाग असल्याच्या आरोपाने प्रकाश झोतात आलेले वादग्रस्त मनोहर उर्फ संभाजी भिडे हे बुधवारी नागपुरात येत असून ते कार्यकर्त्यांची बैठक घेत आहेत. राज्याच्या उपराजधानीत होणारी बैठक नेमकी कशासाठी आणि त्यात  ते  काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. भिडे शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान संस्थेचे संस्थापक असून या प्रतिष्ठानच्या नागपूर शाखेने सुभाष रोड, गीता मंदिर येथे  बैठक आयोजित केली केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संभाजी भिडे हे वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. अनेकदा वाद निर्माण करतात. त्यांच्याविरुध्द भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. नंतर दोषारोपपत्रातून त्यांचे नाव वगळणयात आले होते. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणाची चौकशी करणा-या आयोगाकडे प्रतिज्ञा दाखल करून या प्रकरणात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. . या पार्श्वभूमीवर भिडे यांची नागपूर भेट महत्वाची मानली जाते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversial sambhaji bhide tomorrow meeting in nagpur rbt 74 ysh