वर्धा: येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.रजनीश कुमार शुक्ल यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी चार वर्ष हे पद भूषविले. मात्र त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. विद्यार्थी संघटनांसोबत वाद, प्राध्यापकांचे निलंबन, महिला अधिकारी व त्यांचे व्हायरल झालेले संभाषण, विष प्राशन घडामोड, विविध नियुक्त्या यामुळे विद्यापीठ चांगलेच चर्चेत आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दीक्षांत सोहळ्यास राष्ट्रपतींनी ऐनवेळी उपस्थित राहण्यास नकार दिल्याने विद्यापीठाची चांगलीच नाचक्की झाली होती. शेवटी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्र – कुलगुरंचे प्रकरण चर्चेत आले. या पार्श्वभूमीवर त्यांनी अखेर राजीनामा दिला . त्यांच्या पदाची तात्पुरती जबाबदारी ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. एल. कारुण्यकरा यांना सोपविण्यात आल्याचे पत्र कुलसचिव कादर नवाज खान यांनी दिले आहे.