अकोला : ‘नीट’च्या परीक्षेदरम्यान मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब व बुरखा घातल्याने त्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारल्याचा प्रकार वाशीममध्ये समोर आला आहे. या प्रकरणी पालकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वाशीम येथील मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय केंद्रावर मुस्लिम विद्यार्थिनींना चेहरा व ‘हॉल टिकिट’ दाखविल्यानंतर ही हिजाब व बुरखा काढण्यास लावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इरम मोहम्मद जाकीर व अरिबा समन गझनफर हुसैन यांच्यासोबत केंद्रातील प्रशासकीय अधिकारी व सदस्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.  बुरखा काढा नाही तर कात्रीने कापावे लागेल, असे म्हणून भर रस्त्यात हिजाब व बुरखा काढायला लावला गेल्याची तक्रार पालकांकडून करण्यात आली आहे.

आधी परीक्षा कक्षात येण्यास मज्जाव करण्यात आला, नंतर हिजाब आणि बुरखा काढून टाका असे सांगून बाहेर पाठवण्यात आले. वादावादी झाल्यानंतर शेवटी रस्त्यावर बुरखा आणि हिजाब काढण्यात आला. परीक्षा कक्षातही  शिक्षकाचे वर्तन योग्य नसल्याचे पीडित विद्यार्थिनीने म्हटले आहे. या प्रकरणी तक्रार देण्यात आली असून ठाणेदार रफीक शेख चौकशी करीत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy exam center wearing hijab students allege denied entry ysh
Show comments