नागपूर : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या ‘नीट’ सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होताच देशभर वाद निर्माण झाला आहे. २०२३ मध्ये केवळ दोन विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले असताना यंदा त्यात भर पडून तब्बल ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले असून ‘पात्रता गुणां’मध्ये (कट ऑफ) प्रचंड वाढ झाली. ७०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला थेट दोन हजारांच्या जवळपास ‘रँक’ मिळणार आहे.

यंदा अचानक गुणांमध्ये तफावत दिसून येत असल्याने विद्यार्थी, पालकांकडून परीक्षा घेणाऱ्या ‘एनटीए’वर शंका उपस्थित केली जात आहे. काही पालकांनी निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णयही घेतला आहे.

Canada
Indian students in Canada : भारतातून कॅनडात गेलेल्या २० हजार विद्यार्थांची महाविद्यालयांना दांडी, आकडेवारी आली समोर
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Mumbai Municipal Corporation , Class two Test,
मुंबई : स्वयंअध्ययनातील निपुणतेसाठी दुसरीच्या विद्यार्थ्यांची चाचणी
Education Institute Quality, Education Institute ,
अशा वातावरणात कशी वाढणार शिक्षणाची गुणवत्ता?
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
foreign universities loksatta news
दूरदेशीच्या ज्ञानवाटा: देशोदेशीच्या प्रवेश परीक्षा
Idol exam today but some students don't have admit cards for exam Mumbai
‘आयडॉल’ची आज परीक्षा; मात्र काही विद्यार्थ्यांच्या हातात ‘प्रवेशपत्र’च नाही; मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, परीक्षा केंद्रांवर संभ्रमाचे वातावरण
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?

आणखी वाचा-समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, सीआरपीएफच्या दोन जवानांचा मृत्यू

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), अभिमत विद्यापीठे, केंद्रीय विद्यापीठांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस, बीडीए, आणि बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट’चा निकाल ४ जूनला जाहीर झाला. यात देशभरातून सुमारे २४ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ५ लाख ४७ हजार ३६ विद्यार्थी आणि ७ लाख ६९ हजार २२२ विद्यार्थिनी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरल्या. यातील खुल्या गटातून ३ लाख ३३ हजार ९३२, ओबीसीतून ६ लाख १८ हजार ८९० एससीतून १ लाख ७८ हजार ७३८ एसटीतून ६८ हजार ४७९ आणि ईडब्ल्यूएसमधून १ लाख १६ हजार २२९ विद्यार्थी पात्र ठरले.

देशातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या शासकीय आणि खासगी मिळून ५४९ महाविद्यालयांच्या ७८ हजार ३३ जागांसाठी प्रवेश दिला जातो. मात्र, उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या १३ लाख १६ हजार २६८ इतकी आहे. यात मागील वर्षीच्या तुलनेत १ लाख ७० हजारांनी वाढ झाली आहे. यात ७२० ते ६५० पर्यंत गुण मिळवणाऱ्यांच्या संख्येत चारपट वाढ झाली आहे. परिणामी, यंदा खुल्या गटाच्या ‘पात्रता गुणां’मध्ये ७२०-१३७ वरून ७२०-१६४ इतकी वाढ झाली आहे. त्यात मिळालेल्या गुणांच्या तुलनेत देण्यात आलेल्या रँकमध्ये मोठा फरक आहे. अनेक विद्यार्थ्यांची ७०० गुण मिळवल्यानंतरही रँक दोन दोन हजाराने खाली आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ६०० ते ६५० गुण घेणाऱ्यांना यंदा प्रवेश मिळणार की नाही, अशीही शंका उपस्थित केली जात आहे.

आणखी वाचा-१३ वर्षांची मुलगी सहा महिन्यांची गर्भवती, प्रियकराचे नाव…

‘एम्स’च्या प्रवेशासाठी स्पर्धा वाढणार

देशात १५ ‘एम्स’ महाविद्यालयांमध्ये १२०५ जागांसाठी प्रवेश दिला जातो. २०२३ मध्ये ६८५ गुणांपर्यंत ‘एम्स’मध्ये प्रवेश मिळाला होता. मात्र, यंदा ७२० गुण घेणाऱ्यांचीच संख्या ६७ इतकी आहे. तर ७०० गुण घेणाऱ्यांची संख्याही जवळपास दोन हजारांच्या घरात आहे. त्यामुळे ‘एम्स’मध्ये प्रवेशासाठी स्पर्धा वाढणार आहे.

६५० गुण घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक

वैद्यकीय पदवी प्रवेशांसाठी समुपदेशन समितीकडून अखिल भारतीय १५ टक्के कोट्याअंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबवली जाते तर उर्वरित ८५ टक्के जागांवर प्रवेशासाठी संबंधित राज्यांतील यंत्रणेकडून प्रवेश दिले जातात. यंदा ८५ टक्के राज्यातील जागांवर प्रवेशासाठी प्रचंड चढाओढ राहणार आहे. २०२३ मध्ये ६३० गुण घेणाऱ्यांची संख्या ही १२ हजार ५००च्या घरात होती. ती यंदा ५० हजारांवर गेली. तर ६३७ गुण मिळवणाऱ्यांची संख्या जवळपास ४४ हजारांवर आहे. ६५० गुण घेणाऱ्यांची संख्याही सर्वाधिक आहे. त्यामुळे ८५ टक्के राज्यातील जागांवर प्रवेश हे ६५० ते ६४० पर्यंत राहण्याची शक्यता आहे. तर अखिल भारतीय १५ टक्के कोट्यामध्ये प्रवेश मिळणेही कठीण होणार आहे.

आणखी वाचा-६ कोटींचा धानखरेदी घोटाळा, तत्कालीन व्यवस्थापकासह कनिष्ठ सहायकास अटक

पात्रता गुणांमध्ये तफावत

प्रवर्ग पात्रता गुण २०२३पात्रता गुण २०२४
खुला ७२०-१३७ ७२०-१६४
एससी, एसटी, ओबीसी १३६-१०७१६३-१२९
एससी, एसटी, ओबीसी-पीएच१२०-१०७१४५-१२९

Story img Loader