अमरावती: आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद संपुष्टात आल्याचे चित्र असतानाच रवी राणा यांच्या ताज्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. आ. राणा यांनी बुधवारी प्रसार माध्यमांशी बोलताना आ. कडू यांना आव्हान देत ‘पुन्हा आमदार म्हणून कसा निवडून येणार ते पाहतो,’ अशा शब्दात इशारा दिला आहे.

आ. राणा म्हणाले, मी स्वत: पुढे येऊन वाद मिटवलेला आहे. पण एक लक्षात ठेवा, कुणी जर मला दम देत असेल तर ते सहन करणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनादेखील रवी राणा घाबरलेला नाही. बच्चू कडू तर काहीच नाही. ते दम देऊन बोलत असतील तर त्यांना जशास तसे उत्तर मी देईन. मग ते उत्तर कोणत्याही पातळीवर असेल, ते देईन. ते ज्या स्तरावर म्हणतील त्या स्तरावर उत्तर द्यायला तयार आहे. प्रेमाची भाषा बोलाल तर रवी राणा दहा वेळा झुकायला तयार आहे. मात्र, कुणी दम देऊन बोलत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची देखील हिंमत आहे.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
ajay devgan and aamir khan
‘इश्क’च्या शूटिंगवेळी चिपांझीने केलेला हल्ला; ‘वाचवा, वाचवा’ म्हणत आमिर खान ओरडला अन् अजय देवगणने धावत्या कारमधून…

मंत्रीपद मिळणे किंवा न मिळणे हा विषय आपल्या अधिकार क्षेत्रातला नाही. तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा अधिकार आहे. माझे नेते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आहेत. त्या दोन्ही नेत्यांचा आदर-सन्मान करून दोन पावले मी मागे आलो आहे आणि दिलगिरी व्यक्त केली आहे. कुणाचेही मन दुखावू नये म्हणून तो विषय मी संपवला आहे. पण वारंवार मी रवी राणाला माफ करणार नाही, असा दम आ. कडू देत असेल, तर मलाही उत्तर द्यावे लागेल. तुला कुणी सांगितले मला माफ करायला, तुझ्यामध्ये एवढी हिंमत असेल तर तू कसा निवडून येतो ते पाहा. वेळ सांगेल की बच्चू कडू पुन्हा आमदार बनेल की नाही बनणार, अशा एकेरी शब्दात आ. राणा यांनी आव्हान दिले आहे.