नागपूर: नागपूर लोकसभा मतदारसंघात मतदाना दरम्यान शुक्रवारी काही केंद्राजवळील राजकीय पक्षाच्या बुथवर भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आणि कमळाचे चिन्ह असलेल्या मतचिठ्ठ्या मतदारांना दिल्या जात होत्या. नारा येथे अशाच प्रकारे मतचिठ्ठ्या देण्यावरून भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुथवरील यंत्र फोडले. त्यावरून तणाव निर्माण झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… मद्य पिऊन ईव्हीएम चुकीच्या पद्धतीन सील…..निवडणूक कर्तव्यावर असताना उपअभियंत्याचा…..

हेही वाचा… ”वस्त्रहरणाच्या वेळी भीष्माचार्य, द्रोणाचार्य जसे चूप बसले तसेच काल संजय राऊत…”.

नागपूर लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी मतदान पार पडले..शहरातील नारा, जरिपटका, मध्य नागपुरातील नाईक तलाव परिसरात भाजपच्या बुथवर कार्यकर्ते मतदारांना गडकरींचे नाव भाजपचे चिन्ह असलेल्या मतचिठ्ठ्या देत होते. ‘कहो दिल से नितीन जी फिरसे..’ असा त्यावर उल्लेख होता. यावर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी अक्षेप घेत ही कृती नियमांचा उल्लंघन करणारी असल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी गडकरींचा फोटो आणि भाजपचा मतचिठ्ठी काढणारे यंत्र तिथून हटवण्यास सांगितले. यावरून तिन्ही ठिकाणी भाजप- काँग्रेसमध्ये वादावादी झाली. नारा परिसरात संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे चिठ्ठी देणारे यंत्रच फोडले. तर मध्य नागपुरातील संत कबीर उच्च प्राथमिक आणि हायस्कूल या केंद्रावर आक्षेप घेतल्यावर हे यंत्र पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रसंगी भाजपचे सुमारे ३०० कार्यकर्त्यांनी एकत्र येत निदर्शने केली. आमदार प्रवीण दटके यांनी येथे धाव घेत पोलिसांशी चर्चा केली.दरम्यान पोलिसांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर हे यंत्र परत करण्यात आले. गेले. परंतु त्यानंतर भाजपने हे यंत्र तेथून हटवले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy nitin gadkari photo on the booth agitation of congress in nagpur mnb ask
Show comments