‘टिनपाट’ ही शिवी नाही, हा तुच्छतादर्शक शब्द आहे. बोलीभाषेत हा शब्द सर्रास वापरला जातो. लायकी नसलेले, कमी दर्जाचे, या अर्थाने कुणाचा उल्लेख करायचा असेल तर हा शब्द वापरून समोरच्याला हिणवण्याची पद्धत आपल्याकडे रूढ आहे. या शब्दमहात्म्याची चर्चा यासाठी की, नुकताच हा शब्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी वापरला. तोही जाहीरपणे, भर व्यासपीठावरून! हा शब्द ज्यांच्यासाठी वापरला त्या विलास मुत्तेमवारांचे नाव गडकरींनी घेतले नाही. अघळपघळ व सैल बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले गडकरी याबाबतीत हुशार निघाले, पण त्यांनी नाव न घेताही तो शब्द कुणासाठी आहे, हे जनताजनार्दनाला बरोबर कळले. त्याची योग्य ती प्रतिक्रिया उमटली आणि मुत्तेमवारांच्या वतीने विकास ठाकरे यांनी या शब्दावरून गडकरींवर बरेच तोंडसुख घेतले. या साऱ्या वादविवादाला निमित्त ठरले ते मिहानमध्ये योगगुरू रामदेवबाबांच्या उद्योगाचे झालेले आगमन!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मिहान हे तसे मूळचे काँग्रेसचे अपत्य. मात्र, त्याला गती मिळत आहे आता भाजप राजवटीच्या काळात. मिहानची सुरुवात झाली तेव्हा गडकरी साधे आमदार होते. विरोधी पक्ष म्हणून वावरत होते. अर्थात, विरोधक या नात्याने तेव्हा त्यांना मिहानवर टीका करण्याचा हक्क होता, पण त्यांनी ती केली नाही, उलट, मिहान ही विदर्भातील युवकांसाठी चांगली संधी आहे, त्याचे सोने करा, असे सांगत गडकरी तेव्हा विदर्भभर व्याख्याने देत फिरले होते. तेव्हा अनेकांना याचे अप्रूप वाटायचे. प्रकल्प काँग्रेस राजवटीतील आणि प्रचार गडकरी करत आहेत, यावरून चर्चाही झडायच्या. गडकरींनी त्याची फिकीर केली नाही व जे चांगले त्याचा पुरस्कार करण्यात कमीपणा दाखवला नाही. दुसरीकडे, मुत्तेमवार मिहान हे आपलेच अपत्य आहे व त्याचे जनुकीय पालकत्व दुसऱ्या कुणाकडे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, याच भ्रमात कायम वावरले. या अपत्याला वाढवावेही लागेल, याचा विसर त्यांना सत्ताकाळात बरेचदा पडला. मिहानमधील अडथळे दूर करायला मुत्तेमवारांनी काहीच प्रयत्न केले नाही, असेही नाही, पण त्यांना त्यात फार यश आले नाही. त्यांच्या कार्यकाळात मिहान उद्योगमुक्तच राहिले. गडकरी व फडणवीसांनी सत्ता मिळताच या प्रकल्पातील अडथळे तातडीने दूर केले. संरक्षण खात्याच्या जमिनीचा प्रश्न सोडवला व आता उद्योगासाठी ते प्रयत्नरत आहेत. याचाच एक भाग म्हणून रामदेवबाबांच्या पतंजलीला त्यांनी जागा दिली. ती स्वस्तात दिली, असा आरोप मुत्तेमवारांनी केला आणि नंतर टिनपाटचे रामायण सुरू झाले.

मिहान संदर्भातील या वस्तुस्थितीच्या पाश्र्वभूमीवर हे नेते व त्यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या भाषेचा दर्जा यावर विचार व्हायला हवा. सात वेळा खासदार राहिलेल्या मुत्तेमवारांना गडकरी व फडणवीस अजूनही बच्चेच वाटतात. अनेकदा त्यांच्या तोंडून या दोघांचा उल्लेख एकेरीत होतो. आता हे दोन्ही नेते ज्या पदावर आहेत, किमान त्या पदाचा तरी मान दाखवायला हवा, हे मुत्तेमवारांना कोण सांगणार? राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतच राहतात. मात्र, ते करताना सभ्यता पाळायला हवी, असे संकेत आहेत. त्याचे पालन हे मोठे नेते करणार नसतील, तर त्यांच्या छत्रछायेखाली वावरणाऱ्यांनी आदर्श म्हणून बघायचे तरी कुणाकडे? रामदेवबाबांना स्वस्तात जमीन दिली, हा आरोप करून मुत्तेमवारांनी राजकीयदृष्टय़ा काहीही चूक केली नाही. मात्र, एकेरीतील उल्लेख त्यांना टाळता आला असता. मिहान कुणी आणले, त्याला गती कोण देते, हे जनतेला बरोबर कळते. सत्तेत नसताना सुद्धा मिहानचे श्रेय आपलेच, असे म्हणण्यात काही हशील नसते, हे या ज्येष्ठांना कोण सांगणार? गडकरींचा एकेरीत उल्लेख करताना त्यांच्या स्कूटरची हमखास आठवण दिली जाते. हे मीठ चोळण्याचे प्रकार कशासाठी केले जातात? ही सारी मंडळी राजकारणात येण्याआधी काय होती व नंतर काय झाली, हे जनतेला कळलेले आहे. त्यांना पुन्हा सांगायचा अट्टाहास कशासाठी?

भाषेचा हाच नियम गडकरींनाही लागू होतो. आरोप करणे विरोधकांचे कामच आहे. त्यावर इतके चिडण्याचे कारण काय? चिडणे, संतापणे, हा मानवी स्वभावाचा भाग आहे, हे गृहीत जरी धरले तरी तो व्यक्त करण्यासाठी सभ्य शब्दांचा आधार गडकरी का घेत नाहीत? विरोधकांवर टीका करणे आणि त्यांची तुच्छतादर्शक पद्धतीने हेटाळणी करणे, यात भरपूर फरकआहे, हे या सन्माननीय नेत्यांना कोण सांगणार? मुत्तेमवारांच्या सक्रिय अथवा निष्क्रियतेविषयी भलेही मतभेद असतील, पण जनतेने त्यांना सात वेळा निवडून दिले, हा इतिहास आहे. असभ्य भाषेत टीका करताना किमान हा इतिहास तरी या नेत्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. सत्ता ही चंचल असते. आज ती एकाच्या तर भविष्यात दुसऱ्याच्या दारी असते, त्यामुळे सत्तेचा अमरपट्टा बांधून कुणी आजन्म राहू शकत नाही. असभ्य अथवा एकेरी भाषेत टीका करताना या साऱ्याच नेत्यांनी हे वास्तव विसरणे योग्य नाही. मुळात सध्याच्या राजकारणात सकारात्मकताच लोप पावत चालली आहे. सहकार्याचा अभाव जागोजागी जाणवतो. हातात हात घालून काम करू, असे कुणाला स्वप्नातही वाटेनासे झाले आहे. त्याचा फटका या नेत्यांना बसत नाही, तर विकास प्रकल्पांना बसतो. मिहानच्या बाबतीत असेच राजकारण जनतेने याआधी खूप अनुभवले आहे. तेव्हा तर मुत्तेमवारांना स्वपक्षीय, तसेच मित्रपक्षाच्याच नेत्यांचा सामना करावा लागला होता. तेव्हा उलट गडकरी व फडणवीस सकारात्मक दृष्टिकोन बाळगून होते. हा इतिहास या असभ्यस्तर गाठणाऱ्या नेत्यांनी आता आठवून बघावा. येत्या पाच वर्षांत मिहानला गती मिळाली नाही व समृद्धी महामार्ग वेळेत पूर्ण झाला नाही, तर विदर्भ हा वृद्धांचा प्रदेश म्हणून ओळखला जाईल, याचे भान या राजकारण करणाऱ्या नेत्यांनी ठेवण्याची गरज आहे. त्यामुळेच टिनपाट, स्कूटर या शब्दांना तसेच एकेरी उल्लेखांना कायमची रजा देणे, हेच या प्रदेशाच्या हिताचे ठरणारे आहे.

देवेंद्र गावंडे -devendra.gawande@expressindia.com