देवेश गोंडाणे, लोकसत्ता

नागपूर: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (माफसू) कुलगुरू पदासाठी कुलपती व राज्यपाल रमेश बैस यांनी पाच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये मुलाच्या प्रवेशासाठी खोटे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्याच्या प्रकरणात दोषी ठरलेले गुजरातमधील गांधीनगरच्या कामधेनू विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेशकुमार केलावाला यांची अंतिम पाच उमेदवारांत निवड झाल्याने शैक्षणिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, गुजरातमधील दोषी व्यक्तीला महाराष्ट्राच्या विद्यापीठात स्थान देणे अयोग्य असल्याची तक्रार राज्यपाल कार्यालयाकडे करण्यात आली आहे.

minister abdul sattar Attempt to grab industrial plots
शिक्षण संस्थेच्या नावाखाली औद्योगिक भूखंडावर डोळा, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या खेळीस अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे चाप
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi Candidate pune, Vanchit Bahujan Aghadi,
“भाजपचा आरक्षण संपविण्याचा मोठा डाव”, कोणी केला हा गंभीर आरोप ?
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Akola Sessions Court sentenced family to death citing Mahabharata High Court disagreed
‘महाभारताचा’ उल्लेख करत फाशीची शिक्षा, उच्च न्यायालयाचे सत्र न्यायालयावर ताशेरे…
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी मागील तीन महिन्यांपासून निवड प्रक्रिया सुरू आहे. यासाठी ३० उमेदवारांनी अर्ज केले होते. यातील पंधरा उमेदवारांचे अर्ज सादरीकरणासाठी निवडण्यात आले होते. १५ व १६ जूनला त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून पाच अंतिम उमेदवारांची निवड करण्यात आली. राज्यपालांनी ३० जूनला या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये जोधपूर विद्यापीठाचे डॉ. नितीन पाटील, तिरुपती येथील डॉ. राव, डॉ. अशोक कुमार, डॉ. राव आणि गुजरात येथील डॉ. नरेशकुमार केलावाला यांचा समावेश होता.

हेही वाचा… राजकीय वर्तुळात चर्चा! आमदार प्रतिभा धानोरकर यांना दिल्लीतील काँग्रेस नेत्यांचे तातडीचे निमंत्रण

मात्र, डॉ. केलावाला यांनी गुजरातच्या नवसारी येथील कृषी विद्यापीठातंर्गत येणाऱ्या ‘व्हेटरनरी’ महाविद्यालयाचे प्राचार्य असताना आपल्या दोन्ही मुलांच्या प्रवेशासाठी खोटे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र तयार केल्याचा आरोप होता. २००८ मध्ये यासाठी डॉ. केलावाला यांना दोषीही ठरवण्यात आले होते. असे असतानाही त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले.

विश्लेषण समितीचा ठपका

डॉ. केलावाला प्राचार्य असल्याने त्यांचे उत्पन्न अधिक असतानाही त्यांनी खोटे प्रमाणपत्र सादर करून मुलगा दिव्येश व रोहन यांचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र तयार केले होते. याची तक्रार विकसित जाती कल्याण विभागाच्या संचालकांकडे करण्यात आली होती. त्यानंतर विश्लेषण समितीसमोर प्रमाणपत्र बनवणाऱ्या तीन अधिकाऱ्यांची साक्ष घेण्यात आली. उत्पन्न मर्यादेत न मोडत असतानाही नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र बनवल्याच ठपला समितीने ठेवला होता.

कुणाचा दबाव?

डॉ. केलावाला यांच्यावर अनेक आरोप असताना आणि राज्यपाल कार्यालयाकडे त्यांची तक्रार झाली असतानाही त्यांच्या निवडीसाठी कोण दबाव टाकत आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यपालांकडे केलेल्या तक्रारींमध्ये सर्व सत्य मांडण्यात आले असतानाही राज्यपाल कार्यालयाने गुजरातच्या राज्यपालांशी पत्रव्यवहार करून डॉ. केलावाला यांच्या तक्रारींसदर्भात विचारणा केल्याची माहिती आहे.

नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राच्या प्रकरणात माझा दोष नाही. प्रमाणपत्र तयार करणाऱ्या अधिकाऱ्याला यासाठी दोषी ठरवण्यात आले आहे. तसेच मी संबंधित समितीसमोर संपूर्ण प्रकरणाचा खुलासा लिहून दिला आहे. २००८ मधील हा प्रकार असून त्यानंतर २०१८ मध्ये कामधेनू विद्यापीठामध्ये माझी कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली. मी दोषी नसल्यामुळेच ही निवड झाली. – डॉ. नरेशकुमार केलावाला, कुलगुरू, कामधेनू विद्यापीठ, गांधीनगर.