वर्धा : अवघा पाच दिवसाचा असताना आई सोडून गेली.कारण जन्मतः त्याचे डोळे आत वळले होते. दिसेनासे होत असल्याने ती चाचपडत जंगलात भटकत असताना वन अधिकाऱ्यांची त्याच्यावर दृष्टी पडली. देव तारी त्यास कोण मारी असे त्यास लागू पडावे.येथील करुणाश्रम या वन्य जीवांचा सांभाळ करणाऱ्या संस्थेकडे त्याला सुपूर्द करण्यात आले.आज दीड वर्ष होत आहे.प्रथम तीन वर्ष त्याच्या डोळ्यावर उपचार व शुष्रूषा करण्यात गेले.त्यानंतर त्याचे जग्गू म्हणून नामकरण झाले.बाळसे धरता धरता तो चांगला मोठा झाला.
त्याची सर्व ती काळजी घेतल्या जाते.उन्हाची काहीली त्यास जाणवू नये म्हणून खास कुलर लावण्यात आला. इतर शेजारी प्राण्यांना वाकुल्या दाखवीत जग्गू कुलरच्या थंडगार हवेत आराम व मस्त चेष्टा करतो. करुणाश्रमचे आशिष गोस्वामी सांगतात की ठराविक काळाने इथले प्राणी वन विभाग ताब्यात घेवून जंगलात सोडतात.मात्र जग्गू बाबत तसे होणार नाही.तो मानवी संगोपनात वाढला.म्हणून त्याला जंगलात न सोडता नियमानुसार प्राणी संग्रहालयात सोडल्या जाईल.थोड्याच दिवसाचा तो पाहुणा आहे.