अमरावती : अवैधरित्या सावकारी करणाऱ्या दोघांच्या घरी सहकार विभागाने छापे टाकून व्यवहाराची ४६ महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केली. अचलपूर शहरातील दोन ठिकाणी ही कारवाई स्वतंत्र दोन पथकांमार्फत करण्यात आली.

जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्याकडे अचलपूर शहरातील दोन ठिकाणी अवैध सावकारीच्या व्यवसायासंदर्भात तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार त्यानी दोन स्वतंत्र पथक गठित करून कारवाई केली. कांडली येथील राजकुमार गुळधे यांच्या निवासस्थानी साहाय्यक निबंधक के. एस. बलिंगे यांच्या नेतृत्वातील पथकाने छापा टाकला. या कारवाईत करारनामे, कोरे धनादेश व इतर असे १३ दस्तऐवज जप्त करण्यात आलेत. तर, दुसरी कारवाई अचलपूरातील जुना सराफा येथील रमेश गुलाबचंद तांबी यांच्या निवासस्थानी करण्यात आली. या कारवाईत कोरे धनादेश, करारनामे व इतर कागदपत्रे असे ३३ दस्तऐवज जप्त करण्यात आलेत. ही कारवाई साहाय्यक निबंधक ए. डी. चर्जन यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कागदपत्रांच्या तपासणीनंतर दोन्ही सावकारांविरूद्ध नियमानुसार सावकारी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली आहे. कांडली येथील कारवाईत पथकप्रमुख ढोके, गडलिंग, सपकाळ व कुऱ्हाडे, तर जुना सराफा बाजार येथील कारवाईत मुळे, अरबट, कुकडे व दहातोंडे यांचा सहभाग होता.

suresh dhas prajakta mali on santosh deshmukh murder
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी मांडली भूमिका; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sandeep Kshirsagar on Viral Photo
Sandeep Kshirsagar: तरुणीबरोबरच्या त्या व्हायरल फोटोवर आमदार संदीप क्षीरसागर यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “तो फोटो…”
Chhatrapati Sambhajiraje On Santosh Deshmukh Case
Chhatrapati Sambhajiraje : “पंकजा मुंडे स्वतः म्हणाल्या होत्या वाल्मिक कराडांशिवाय धनंजय मुंडेंचं…”, मस्साजोगच्या घटनेवरून छत्रपती संभाजीराजे आक्रमक
Nearly 3 5 lakh rupees stolen from vehicle of president of Yavatmal Farmers Bank
यवतमाळ : बँकेचे अध्यक्ष पार्टीत रमले; एका चालकाने साडेतीन लाख उडविले…
Four rare silver bears die in accident on Chandrapur Mool highway
चार दुर्मिळ चांदी अस्वलांचा मृत्यू, जंगलाला लागून असलेल्या मार्गावरील वाहतूक ठरतेय कर्दनकाळ
ameya khopkar slams suresh dhas over prajakta mali
“तुमच्या गलिच्छ राजकारणात…”, अमेय खोपकरांची प्राजक्ता माळीचं नाव घेणाऱ्या सुरेश धस यांच्यावर टीका; म्हणाले, “हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे…”
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”

हेही वाचा >>>हजारो कृषिमित्र तीन वर्षांपासून बेरोजगार, सरकारविरोधात संताप

अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात बेकायदा सावकारकीचा व्यवसाय सुरु आहे. वास्तविक पाहता जिल्हा उपनिबंधकांकडून (डीडीआर) रितसर परवाना घेतलेल्यांनाच सावकारकीचा म्हणजे नियमानुसार अल्प दराने बँकेच्या दरात व्याजाने पैसे देण्याचा अधिकार आहे.

 सरकारच्या प्रचलित व्याजदरानुसारच कर्ज देण्याचे निर्बंध त्यांच्यावर आहेत. बिगरशेती तारणी कर्ज वार्षिक १५ टक्के तर विनातारण कर्ज वार्षिक १८ टक्के व्याजदराने द्यावे, असे निकष आहेत. शेतीसाठी तारणी कर्ज वार्षिक नऊ टक्के तर विनातारण कर्ज १२ टक्क्यांनी देण्याची अट आहे. काहीजण प्रामाणिकपणे अटीचे पालन करतात. पण, काही लोक त्याचे पालन करीत नाहीत.

हेही वाचा >>>बहुचर्चित सूरजागड लोहखाणीचा पुन्हा विस्तार, ३१ गावे होणार प्रभावित

अनेक अवैध सावकार हे  व्याजदरात मनमानी करतात. काही वर्षातच मुद्दलाच्या दुप्पट व्याजाची रक्कम होते आणि तेवढे पैसे एकाचवेळी देणे अशक्य झाल्याने अनेकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

अशावेळी पोलिस धनाढ्याविरूद्ध तक्रार दाखल करून घेतील का, आपल्याला न्याय मिळेल का, असे प्रश्न त्या निराश्रितांच्या मनात येतात. पण, संबंधित व्यक्तीला पोलिसांकडूनही आणि महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम- २०१४ अंतर्गत जिल्हा उपनिबंधकाकडूनही न्याय मिळू शकतो.

Story img Loader