नागपूर : करोनाने जगभरातच अनेकांना यमसदनी पाठवले. राज्याच्या उपराजधानीतही शेकडो लोकांना करोनाने मृत्यूच्या दारात लोटले. करोनाचा प्रादूर्भाव ओसरला आणि सारेच आरोग्याप्रती सजग झाले. यातून मृतात्मेही सुटले नाहीत. नागपूर महापालिकेला माणसांपेक्षा या मृतात्म्यांचीच अधिक काळजी आणि म्हणूनच की काय त्यांनी गंगाबाई स्मशानघाटावरच ‘ग्रीन जीम’ची उपकरणे लावली. ही ‘ग्रीन जीम’ साऱ्यांसाठीच चर्चेचा विषय ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोग्याप्रती सजगता जशी माणसांमध्ये आली आहे, तशीच पालिका प्रशासनानेही नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यास सुुरुवात केली आहे. त्यासाठी शहरातील उद्याने, खेळण्याचे मैदान, मोकळ्या जागेत ‘ग्रीन जीम’ची उपकरणे लावण्यात येत आहे. ही उपकरणे लावण्यासाठी आधी महापालिकेकडे प्रस्ताव सादर कराव लागतो. तो प्रस्ताव आल्यानंतर महापालिकेचे संबंधित अधिकारी त्या ठिकाणाला भेट देतात. ती जागा योग्य वाटली, तरच त्याठिकाणी ‘ग्रीन जीम’ची उपकरणे लावण्यासाठी ठेकेदारांना कंत्राट दिले जाते.

हेही वाचा >>> गटातटात विभागलेले काँग्रेस नेते अडबालेंना मदत करणार?; चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील नेत्यांना एकत्र आणण्याचे आव्हान

उपराजधानीत ठिकठिकाणी व्यायामाची उपकरणे लावण्यात आली आहेत. मात्र, त्यातील अर्ध्यापेक्षा अधिक उपकरणे ही तुटलेली आहेत, तर काही खराब झाली आहेत. एकीकडे नागरिकांच्या आरोग्यांचा कळवळा दाखवणाऱ्या महापालिकेला या तुटलेल्या व खराब झालेल्या उपकरणांची दुरुस्ती दिसत नाही. घाटावर ‘ग्रीन जीम’ उभारण्याच्या महापालिकेच्या या संकल्पनेवर हसावे की रडावे, हेच कळत नाही, असे वृक्षप्रेमी सचिन खोब्रागडे म्हणाले. मात्र, नागरिकांपेक्षाही आता त्यांना मृतात्म्यांचीच काळजी अधिक असल्याचे दिसून येते. गंगाबाई स्मशानघाटावर प्रवेश करताच डाव्या बाजूला ‘ग्रीन जीम’ ची उपकरणे लावण्यात आली आहेत. त्यामुळे दररोज सकाळी घाटावरील मृतात्मे येथे व्यायाम करताना दिसली, तर नवल वाटायला नको.