आधी भीतीपोटी पोलीस थांबले, नंतर चोराच्या हाताचे ठसेच मिटले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : कुशीनगरच्या एका तरुणाला करोना झाला. तो रुग्णालयात तर त्याचे कुटुंबीय विलगीकरणात गेले. घर टाळेबंद झाले. परंतु नेमकी हीच संधी साधून चोरटय़ाने त्या घरात चोरी केली. तो तरुण करोनामुक्त होऊन घरी परतल्यावर हा प्रकार पुढे आला. त्याने पोलिसांत तक्रार दिली. परंतु घर करोना रुग्णाचे असल्याने पोलीस तपासासाठी आत जायला तयार नव्हते. अथक प्रयत्नाअंती तरुणाने महापालिकेकडून घराचे र्निजतुकीकरण करून घेतले. परंतु यामुळे चोराच्या हाताचे ठसे मिटल्याची शंका आता खुद्द हा तरुणच व्यक्त करतोय.
कुशीनगरच्या या कुटुंबातील एक सदस्य पोलिसात आहे. याच कुटुंबातील एक तरुण १२ जुलैला करोना रुग्ण असल्याचे चाचणीत पुढे आले. त्याला मेडिकलला दाखल करत इतर सदस्यांना विलगीकरणात घेतले गेले. त्यामुळे हे घर कुलूपबंद होते. हे घर व परिसर प्रतिबंधित झाला. येथे पोलीस बंदोबस्त असतानाही त्यांच्या घरात चोरी झाली.
तरुण करोनामुक्त होऊन घरी परतल्यावर हा प्रकार पुढे आला. तो घरी आल्यावरही त्याचे कुटुंब विलगीकरणात होते. घरी दाराची कुंडी तुटलेली असल्याने त्याला चोरी झाल्याचे कळले. तरुणाने तातडीने जरीपटका पोलीस ठाणे गाठत चोरीची तक्रार दिली. दरम्यान, पोलिसांना त्याच्या घराचे महापालिकेकडून र्निजतुकीकरण झाले नसल्याचे कळले. त्यामुळे घाबरलेल्या पोलिसांनी तरुणाला प्रथम महापालिकेशी समन्वय करून घराचे र्निजतुकीकरण करण्यास सांगितले.
तरुणाने पाठपुरावा करत स्थानिक नगरसेवकाच्या मदतीने र्निजतुकीकरण केले. परंतु ते करताना चोराच्या हाताचे ठसे मिटले, अशी शक्यता हा तरुणच व्यक्त करतो. खरच असे घडले असेल तर चोर कसा पकडला जाईल, हा मोठाच प्रश्न आहे.