मल्टीव्हिटॅमीन, आरोग्यवर्धक पेयांचे वाटप
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मंगेश राऊत, लोकसत्ता
नागपूर : उपराजधानीतील ११ पोलीस कर्मचारी विलगीकरणात आल्यानंतर करोनाबाधित क्षेत्रात बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांच्या आरोग्यावर चर्चा सुरू झाली. पण, रस्त्यावर बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षेचा आधीच विचार करण्यात आला असून करोनाबाधित क्षेत्रात बंदोबस्त करणारे पोलीस व इतरांना हायड्रोक्लोरोक्वीन, मल्टीव्हिटॅमीन व आरोग्यवर्धक पेये देण्यात येत आहेत.
पार्वतीनगर परिसरात मृत पावलेल्या २२ वर्षीय करोनाग्रस्त तरुणाच्या संपर्कसाखळीत बेलतरोडी व अजनी पोलीस ठाण्यातील ११ पोलीस कर्मचारी आलेत. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. दरम्यान सतरंजीपुरा, मोमीनपुरा, डोबीनगर, गिट्टीखदान, गणेशपेठ, पार्वतीनगर, यशोधरानगर, जरीपटका या भागात करोनाचे रुग्ण सापडले असून ते परिसर सील करण्यात आले आहेत. अशा बाधित क्षेत्रात बंदोबस्त करणे आव्हानात्मक असून पोलिसांनाही करोनाची लागण होऊ शकते. याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून बाधित क्षेत्रात बंदोबस्त करणाऱ्यांना हायड्रोक्लोरोक्वीनची मात्रा देण्यात आली आहे. इतर भागात रस्त्यावर बंदोबस्त करणाऱ्यांना मल्टीव्हिटॅमीन व आरोग्यवर्धक पेये वितरित करण्यात येत आहेत. आतापर्यंत पोलिसांना विविध गोळ्यांच्या ८ हजार ५०० स्ट्रीप्स वितरित करण्यात आल्या आहेत. एका स्ट्रीपमध्ये १५ गोळ्या आहेत. यामुळे पोलिसांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल व करोनाची लागण होणार नाही, असा विश्वास अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे यांनी व्यक्त केला.
विलगीकरणासाठी पोलिसांचा आटापीटा
नागपुरातही पोलिसांसाठी स्वतंत्र विलगीकरणाची व्यवस्था करण्याच्या उद्देशाने महासंचालक कार्यालयाने हिरवा कंदीला दिला. परंतु त्यानंतरही गृहमंत्र्यांच्या शहरातील ११ संशयित पोलीस अधिकारी-कर्मचारी वाऱ्यावर असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह सात कर्मचाऱ्यांना बुधवारी रात्री रवीभवनमधील विलगीकरण कक्षात हलविण्यात आले. परंतु येथे जागा नसल्याने त्यांना परत पाठविल्याने सातही कर्मचारी सध्या गृह विलगीकरणात आहेत.