महेश बोकडे

नागपूर : दिवाळीच्या बोनसपासून विविध भत्ते व वेतनाबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आणि विविध कामगार संघटनांतील संघर्ष सर्वश्रूत आहे. आता महामंडळाने तोटय़ातील ‘एसटी’ला सावरण्यासाठी चर्चा करण्याकिरता  एसटीतील सगळय़ाच २५ कामगार संघटनांना बैठकीचे आमंत्रण दिले आहे.

BJP strategy, religious institutions , JP Nadda latest news,
मुंबईतील धार्मिक संस्थांचे पाठबळ मिळविण्यासाठी भाजपची रणनीति, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा साधणार संवाद
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
Farmers Complaints Regarding Soybean Guaranteed Price and Procurement Centre karad
सोयाबीनला हमीभाव अन् खरेदी केंद्रही नाही; शेतकऱ्यांच्या लुटीच्या तक्रारी
Chief Minister Eknath Shinde testimony regarding Irshalwadi displaced houses
इरशाळवाडी विस्थापितांना हक्काची घरे मिळणार; निवडणूक आचारसहिंता लागण्यापूर्वी घरांचा ताबा देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
women empowerment, unique initiative,
महिला सक्षमीकरणाचा अनोखा उपक्रम!
government schemes, BJP MLA Nagpur,
भाजप आमदारांच्या मतदारसंघासाठीच सरकारी योजना आहेत का? बांधकाम कामगारांसाठी देशमुखांचा मोर्चा
Detailed tourism development plan from Directorate of Tourism
एमएमआर क्षेत्रातील पर्यटन विकासासाठी ‘सप्तसूत्री’
Skills training for youth, Skills training youth Maharashtra, Skills training for Israel,
युद्धग्रस्त इस्रायलसाठी राज्यातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण ! कुशल कामगारांचा तुटवडा असल्याचे कारण

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी दोन वर्षांपूर्वी कामगारांनी पन्नास दिवसांहून जास्त काळ संप पुकारला होता. एसटीची आर्थिक स्थिती ढासळली होती. आता एसटी पूर्वपदावर येत आहे. एसटी महामंडळात आताही मान्यताप्राप्त आणि इतर संघटनांकडून कामगारांचे विविध प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला जातो. त्यावर कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी एसटी महामंडळाने  महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनांसह  २५ संघटनांना ३० ऑक्टोबरला मुंबईत बैठकीचे आमंत्रण दिले आहे.

हेही वाचा >>>भाजपा पदाधिकाऱ्याकडून फडणवीसांच्या घरासमोरच पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की, VIDEO शेअर करत संजय राऊत म्हणाले….

बैठकीमध्ये सगळय़ाच संघटनांकडून एसटीतील शिस्त व आवेदन कार्यपद्धतीमध्ये सुधारणासह इतर गोष्टींबाबत मत जाणून घेतले जाणार आहे. तर अपहार प्रणव बदल्या रद्द करणे, कामगारांविरुद्ध प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे मागे घेणे, विश्रांतीगृहात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करणे, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारच्या एस.टी. बसेसमध्ये मोफत पासची सवलत लागू करणे, सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांऐवजी एक वर्षांचा मोफत पास सर्व प्रकारच्या गाडय़ांमध्ये उपलब्ध करण्याबाबत मत या संघटनांकडून जाणून घेतले जाणार असल्याची माहिती आहे. या विषयावर एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि महाव्यवस्थापक (क. व. औ. सं.) अजित गायकवाड यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

या संघटनांना आमंत्रण

महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, कास्ट्राईब रा. प. कर्मचारी संघटना, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस, राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेस, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेस, महाराष्ट्र एसटी चालक-वाहक यांत्रिकी संघटना, बहुजन राज्य परिवहन अधिकारी-कर्मचारी संघटना, राज्य परिवहन यांत्रिकी कामगार संघटना, महाराष्ट्र परिवहन मजदूर युनियन, संघर्ष एसटी. कामगार युनियन, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, भारतीय एसटी कामगार संघटना, विदर्भ एसटी कामगार संघटना, सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ, राष्ट्रीय कर्मचारी संघटना, एसटी कष्टकरी जनसंघ आणि इतर.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने नुकतेच एसटी कामगारांच्या या पाचसह इतर मागण्यांसाठी उपोषण आंदोलन केले होते. त्यामुळे ही बैठक लागली असून त्यात संघटनेतर्फे अध्यक्ष संदीप शिंदे हे कामगार हिताची भूमिका मांडतील.- अजय हट्टेवार, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना.