भंडारा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल नियोजन भवनमध्ये आभासी पद्धतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन झाले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने जिल्ह्यातील या महाविद्यालयाची मान्यता नाकारली होती.

त्यानंतर माजी खासदार सुनील मेंढे यांनी पुन्हा प्रयत्न करीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता मिळवली आणि काल त्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त निघाला. मात्र १० वर्षांपासून महिला रुग्णालयाचे भिजत घोंगडे असताना अचानक या महिला रुग्णालयाच्या अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येणार यावरून वादाची ठिणगी पडली असतानाच आता वैद्यकीय महाविद्यालयासाठी गोपनीय पद्धतीने सुरू असलेल्या कंत्राटी पद भरतीमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी पैसे घेऊन कंत्राटी कामगार भरती प्रक्रिया सुरू असल्याचे उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. 

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
life sentence prisoner escapes from yerawada jail pune
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार
Nalasopara Unauthorized Building, Supreme Court,
पुरे झाली शोभा…
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
Russia Discovers Ancient Gold Treasure in Crimea — Ukraine Considers It Looting
“ते आमचा वारसा लुटत आहेत,” युक्रेनचा आरोप; रशियाने क्रिमियामध्ये शोधला प्राचीन सोन्याचा खजिना !
Image of Zelensky
Russia Vs Ukraine War : “जोपर्यंत नाटोचे सदस्यत्व…”, झेलेन्स्की यांनी का केली युक्रेनमध्ये परदेशी सैन्य तैनात करण्याची मागणी?
pune PMP is likely to increase ticket rates this year
पीएमपीचे तिकीट वाढणार, सर्वसामान्यांचा प्रवास होणार महाग ?

हेही वाचा >>>अमरावती : एक दिवसाचा दुखवटा; राजकुमार पटेल यांचा शिवसेना प्रवेश लांबला…

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनीचे ओळखपत्र घालून ४ कर्मचारी बसलेले होते. या कंपनीला भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी कंत्राट कामगार भरतीचा कंत्राट देण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार या कंपनीने जुलै महिन्यात जाहिरात प्रसिद्ध केली होती.

मात्र, तेव्हा भरती प्रक्रिया झाली नाही आणि काल उद्घाटन होताच आज अतिशय गोपनीय पद्धतीने निवडक उमेदवारांना बोलवून ही प्रक्रिया कुणाच्या परवानगीने घेण्यात आली असा प्रश्न उपस्थित होतो. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे चार कर्मचारी ही प्रक्रिया राबविण्यासाठी आले होते. सामाजिक न्याय भवन येथे असा प्रकार सुरू असल्याची गुप्त माहिती काही माध्यम प्रतिनिधींना मिळाली. या ठिकाणी ७४ उमेदवारांकडून प्रत्येकी २००० रुपये घेण्यात आले असल्याचा आरोप एका महिला उमेदवाराने केला असून तिनेही २००० रुपये दिले असल्याचे माध्यम प्रतिनिधींसमोर सांगितले.

हेही वाचा >>>” देवाभाऊ …”आता भाजपच्या प्रचाराची नवी टॅगलाईन

माध्यमकर्मिना पाहताच तेथील कर्मचाऱ्यनी पळ काढला. त्यावेळी सभागृहात अंदाजे २०० उमेदवारांची उपस्थिती होती. त्यानंतर परिसरात उमेदवारांनी कर्मचारी आमचे पैसे घेऊन फरार झाले म्हणत एकच गोंधळ घातला. मात्र हा प्रकार अत्यंत गंभीर असून याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

याबाबत समाजकल्याणचे प्रभारी अधिकारी मडावी यांना विचारणा केली असता सामाजिक न्याय भवनात असा काही प्रकार सुरू आहे याबाबत कोणतीही कल्पना नाही. क्रिस्टल कंपनीचे सफाई कर्मचारी आमच्यकडे  नियुक्त आहेत. मात्र हा प्रकार कोण करीत आंहे याबद्दल कल्पना नाही. सभागृह कोणी खुले केले , सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात परवानगीशिवाय कोणी हे सर्व चालविले याबाबत चौकशी करून कारवाई केली जाईल असे सांगितले.

याबाबत विचारणा करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिवक्ता अंबादे यांच्याही संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या शासकीय पद भरती प्रक्रिया शासन आदेशानुसारच राबविण्यात येतात. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अशा कोणत्याही प्रकारची पद भरती प्रक्रिया सुरू नाही. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावावर कोणती तरी कंपनी उमेदवारांची फसवणूक करीत आहे. फसवूनक झालेल्या उमेदवारांनी पोलीस तक्रार करावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम यांनी केले आहे.

सावळा गोंधळ

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालासाठी एका कंपनीने कंत्राटी कामगार पद भरतीसाठी उमेदवारांकडून पैसे घेऊन छुप्या मार्गाने भरती प्रक्रिया राबवित असल्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी समोर आला. सामाजिक न्याय भवन येथे हा सावळा गोंधळ सुरू होता. मात्र, अचानक काही माध्यमांचे प्रतिनिधी आणि इतर काही उमेदवार पोहचताच कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला.

Story img Loader