लोकसत्ता टीम
बुलढाणा : महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाच्या लढतीत बुलढाण्याचे सहकार नेते ऍड. प्रसेनजीत पाटील यांनी एकतर्फी विजय मिळवीत मंत्री गिरीश महाजन समर्थक उमेदवाराला पराभूत केले.
आज मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात ऍड. पाटील (१०९ मते) यांनी जामनेर (जिल्हा जळगाव) तालुका भाजपाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर (७५ मते) यांचा पराभव केला. त्यांनी अप्रत्यक्षपणे नामदार महाजन यांचे मनसुबे विफल केले. १७ संचालक मंडळामधील १३ उमेदवार अविरोध निवडून आले होते. खामगाव ‘झोन’ चे गेली ३ टर्म संचालक असलेले प्रसेनजीत पाटिल (जळगाव जामोद ,जिल्हा बुलढाणा) यांनी माजी आमदार धृपतराव सावळे यांच्यासाठी माघार घेऊन त्यांना झोन मधून अविरोध दिले. तसेच संपूर्ण राज्यातून असलेल्या ईतर मागासवर्गीय (ओबीसी) मतदारसंघातून निवडणूकीला सामोरे जाण्याचा धाडसी निर्णय घेतला.
आणखी वाचा-मोठी बातमी! सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती, जामीनही मंजूर
प्रसेनजीत पाटील विरोधात मंत्री महाजन यांचे निकटवर्तीय तथा जामनेर भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कार व अजित पवार गटाचे उदगीर (लातुर ) येथील भरत चामले हे उमेदवार रिंगणात उतरले होते. मंत्री महाजन यांनी राज्यभर असलेली संघटनेची, सत्तेची ताकद व ऐनवेळ चामले यांनी बाविस्काराना दिलेला पाठींबा यामुळे निवडणूक अटीतटीची होईल अशी चर्चा होती. मात्र, आजच्या एकतर्फी निकालाने ती फोल ठरली.
यापूर्वी ७ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या निवडणूकीत ११ ‘झोन’ आणि २३ जिल्ह्यातील एकूण २०७ पैकी १४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज ९ जानेवारीला झालेल्या मतमोजणीत प्रसेनजीत पाटिल यांनी चंद्रकांत बाविस्कार यांचा ३४ मतांनी पराभव केला. विजयानंतर नागपूर तथा जळगाव जामोद येथे फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.