अमरावती : Maharashtra mlc election result 2023 विधान परिषदेच्‍या अमरावती विभाग पदवीधर मतदार संघात झालेल्‍या निवडणुकीची मतमोजणी सुरूच असून बाद फेरीच्‍या मतगणनेत आतापर्यंत एकूण २३ उमेदवारांपैकी १२ उमेदवार बाद ठरल्‍यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना ४३ हजार ६१४ तर भाजपाचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांना ४१ हजार २४८ मते प्राप्‍त झाली आहेत. धीरज लिंगाडे हे सध्‍या २ हजार ३६२ मतांनी आघाडीवर आहेत.

मतमोजणीच्‍या चोवीस तासांच्‍या कालावधीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्‍या. पहिल्‍या पसंतीच्‍या मतमोजणीअखेर महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांना ४३ हजार ३४० तर भाजपाचे डॉ. रणजित पाटील यांना ४१ हजार २७ मते प्राप्‍त झाली होती. लिंगाडे यांची आघाडी ही त्‍यावेळी २ हजार ३१३ मतांची होती.

Atul Save, chandrakant khaire
ठाकरेंच्या बंडखोराची माघार, काँग्रेसऐवजी भाजपा सुखावली, अतुल सावेंनी थेंट खैरेंचे पाय धरले; औरंगाबादमध्ये काय घडतंय?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
पुण्यातील कसबा, पर्वती आणि शिवाजीनगर या तीन मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी
Wani Umarkhed constituency the concern of Mahavikas Aghadi increased Chowrangi ladhat in two places and direct fight in five constituencies
वणी, उमरखेडमध्ये महाविकास आघाडीची चिंता वाढली, दोन ठिकाणी चौरंगी तर पाच मतदारसंघात थेट लढत
AMit Thackeray Prasad lad
“भाजपा अमित ठाकरेंचाच प्रचार करणार”, प्रसाद लाडांकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, “सरवणकरांना विधान परिषदेवर…”
Uddhav Thackeray Aditya Thackeray (1)
Maharashtra Elections : “वरळी-वांद्र्यात मदत मिळावी यासाठी भिवंडीवर अन्याय”, माजी आमदाराची उद्धव ठाकरेंवर टीका
Maharashtra assembly election 2024 BJP rebel Dadarao Keche moved out of Maharashtra
आर्वीत राजकीय भूकंप, भाजप बंडखोर दादाराव केचे यांना महाराष्ट्राबाहेर हलविले
independents candidates in six constituencies of Chandrapur will spoil party candidates votes in vidhan sabha election 2024
अपक्ष बिघडवणार पक्षीय उमेदावारांचे राजकीय गणित? चंद्रपूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत ‘उदंड जाहले अपक्ष’

हेही वाचा >>> MLC Election 2023 : अमरावती पदवीधर मतदार संघातील निकाल का रखडला?

वैध मतांची संख्‍या ही ९३ हजार ८५२ इतकी असल्‍याने विजयासाठी आवश्‍यक मतांचा कोटा हा ४६ हजार ९२७ मते इतका निश्चित करण्यात आला होता. मात्र डॉ. रणजित पाटील यांच्या प्रतिनिधीने अवैध ठरलेल्‍या ८ हजार ७३५ मतांचे फेरअवलोकन करण्‍याची मागणी केली. ही मागणी मान्‍य करण्‍यात आली. त्‍यानुसार रात्री उशिरा या मतपत्रिकांची पडताळणी सुरू करण्‍यात आली.

हेही वाचा >>> MLC Election Result : गाणार यांच्या पराभवानंतर प्रतिक्रिया देताना बावनकुळेंचे धक्कादायक विधान म्हणाले, “गाणार हे भाजपचे…”

पडताळणीनंतरही डॉ. रणजित पाटील यांच्‍या मतांमध्‍ये फारसा फरक पडला नाही. यात लिंगाडे आणि डॉ. पाटील यांच्‍या मतांमध्‍ये किंचित वाढ झाली आणि लिंगाडे यांची आघाडी ही २ हजार ३४६ मतांवर पोहचली. यातही डॉ. पाटील यांचे नुकसानच झाले, पण मतांचा कोटा हा ४७ हजार १०१ मतांवर पोहचला. पडताळणीअखेर वैध मतांची संख्‍या ही ९४ हजार २२० तर अवैध मतांची संख्‍या ८ हजार ३८७ इतकी होती. रात्री १ वाजताच्‍या सुमारास बाद फेरीची मतमोजणी हाती घेण्‍यात आली. मतमोजणीला चोवीस तासांहून अधिक कालावधी उलटून गेल्‍यानंतरही अंतिम निकाल लागलेला नाही.