लोकसत्ता टीम

चंद्रपूर : गावठी बनावटी देशी कट्टा तसेच एक नग जिवंत ९ एम.एम. काडतुस बुधवार १२ मार्च रोजी जप्त करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. आरोपीचे नाव संगम संभाजी सागोरे (२८) असे आहे.

रेकॉर्ड वरील आरोपी संगम संभाजी सागोरे (२८) धंदा-ठेकेदारी, रा. मित्रनगर, आंबेडकर कॉलेज मागे, चंद्रपूर हा स्वतः जवळ अग्निशस्त्र (हत्यार) बाळगुन चुनाभट्टी बस स्टॉफ येथे बसलेला आहे अशा माहितीवरून आरोपीस पंचा समक्ष ताब्यात घेवुन त्याचेकडुन एक गावठी बनावटी देशी कट्टा तसेच एक नग जिवंत ९ एम.एम. काडतुस जप्त करून आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन, बल्लारपूर येथे भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनिल गौरकार, सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठवार, दिपक डोंगरे, प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, अमोल सावे, दिनेश अराडे यांनी केली.