गडचिरोली: प्रेमीयुगुलाने एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मुलचेरा तालुक्यातील लक्ष्मीपूर येथे ६ ऑक्टोबरला उजेडात आली होती. या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलीच्या वडिलांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जयदेब समीरण मंडल ( २०, रा. लक्ष्मीपूर), अमेला अमित रॉय ( १८ रा. विजयनगर)  यांच्यात प्रेमसंबंध होते. ५ ऑक्टोबरला दोघेही मध्यरात्री घरातून गायब झाले होते. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही ते आढळले नाहीत.  लक्ष्मीपूर शिवारात एका शेतकऱ्याच्या झोपडीत या दोघांचे एकाच दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळले. दरम्यान, या घटनेची माहिती अमेला हिचे वडील अमित अनिल रॉय (४२) यांना  समजली. त्यानंतर दुपारपासून ते मोबाइल बंद करुन गायब झाले होते. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही ते सापडले नव्हते. अखेर मुलचेरा ठाण्यात ते बेपत्ता असल्याची नोंद केली. पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता त्यांचे शेवटचे लोकेशन गावालगतच्या जंगलात आढळले.  अखेर ७ रोजी सकाळी त्यांचा मृतदेह   जंगलात एका झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. पो.नि. महेश विधाते यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.

हेही वाचा >>>नितीन गडकरी म्हणाले “मी कमिशन घेत नाही, कामात कसूर केल्यास…”

मुलीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पाऊल

दरम्यान, अमित रॉय हे शेती व्यवसाय करत. शांत व संयमी म्हणून ते परिचित होते. मुलीने प्रियकरासोबत आत्महत्या केल्याची बातमी कानावर पडल्यापासून ते अस्वस्थ होते. यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

दोन वर्षांपासून प्रेमसंबंध

अमेला अमित रॉय ही ही बारावीत शिकत होती, जयदेब मिलन मंडल हा बारावी उत्तीर्ण असून त्यानंतर त्याने शिक्षण सोडले होते. दोघांमध्ये दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरु होते, अशी पोलीस सूत्रांची माहिती आहे. विजयनगर ते लक्ष्मीपूर या दोन गावातील अंतर जवळपास ५ ते ६ किलोमीटर असून या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे.

हेही वाचा >>>माथेफिरूचे भयंकर कृत्य… नागपूर रेल्वे स्थानकात प्रवाशांवर हल्ला; दोन ठार, दोघे जखमी

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

युवक व युवती हे दोघेही एकाच जातीचे आहेत. त्यांनी आत्महत्या का केली, याचे नेमके कारण समोर आले नाही. त्यांच्या प्रेमाला कोणाचा विरोध होता का, त्यांचा कोणाशी वाद झाला होता का, या सर्व बाबी पडताळण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple committed suicide by hanging himself with a rope in lakshmipur of mulchera taluka gadchiroli ssp 89 amy