बुलढाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन या गावातील प्रेमीयुगुलाने साखरखेर्डा गावानजीक असलेल्या सूतगिरणी परिसरातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज संध्याकाळी उघडकीस आली. या घटनेने पंचक्रोशीसह सिंदखेडराजा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना ५ वर्षाचा कठोर कारावास
हेही वाचा – दोघेही विवाहित; अडकले प्रेमाच्या जाळ्यात, पतीला कुणकुण लागताच…
प्राथमिक माहितीनुसार, गोपाल अंभोरे (२२) व साक्षी अंभोरे (१३), अशी आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत. दोघेही शेंदुर्जन गावातून दोन दिवसांपासून बेपत्ता होते. आज त्यांचे मृतदेह एका झाडाला लटकलेले आढळून आले. साखरखेर्डा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. साक्षी आठवीत शिकत होती. तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून चार दिवसांपूर्वी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.